मा.निवडणुक निर्णय अधिकारी
सांगली लोकसभा
विषय - चेकपोस्टवरती नागरिकांना होणाऱ्या त्रासा बद्दल
महोदय,
सांगली लोकसभेच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्याच्या सीमेवर व जिल्हा अंतर्गत चेकपोस्ट आहेत परंतु सदर चेकपोस्ट हे सर्व सामान्य माणसांना त्रास देणारे ठरत आहे.रोज कामाला येणाऱ्या व स्वतःच्या चार चाकी गाडीने येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी, नोकरदार तसेच सर्व सामान्य वर्गाला या चेकपोस्ट वरती रोज तासन तास थांबवुन ठेवण्यात येत आहे व त्यांना रोज या त्रासाला सामोरे जावे लागत आहे तरी रोज ये जा करणाऱ्या नोकरदार व्यापारी वर्गाला रोजचे पास देण्यात यावे अन्यथा चेकपोस्टवरती पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी जेणेकरुन सर्व सामान्य नागरिकांची या त्रासातुन मुक्तता व्हावी अन्यथा ह्याचा निवडणुकीत मतदानावर फरक पडणार आहे असे वाटते.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.