मनपा क्षेत्रातील पाणीपुरवठा शाश्वत पद्धतीने व्हावा, लोकहित मंचची आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/04/2024 3:33 PM

प्रति,
 माननीय  श्री शुभम गुप्ताजी 
भा प्र से
आयुक्त, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका 
सांगली

विषय:- सांगली मिरज कुपवाड महानगर पालिका क्षेत्रामधील पाणीपुरवठा शाश्वत पद्धतीने होण्या बाबत....

महोदय, 
          सर्वप्रथम आपण शंभर फुटी तथा राजश्री शाहू महाराज रस्त्याच्या समस्या मध्ये वैयक्तिकरित्या लक्ष घालून आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना स्थळ पाहणी करून योग्य त्या उपाययोजना सह बांधकामात नियमितता तसेच सुसूत्रता येण्याबाबत आदेश दिले त्याबद्दल धन्यवाद. 
           याच अनुषंगाने जनतेचे प्रतिनिधी तसेच  लोकहित मंच सांगली यांच्यामार्फत सांगली मिरज कुपवाड महा नगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा शाश्वत पद्धतीने व्हावा न्याय पद्धतीने व्हावा यासाठी आम्ही आपणाकडे प्रार्थना करत आहोत. 
१. महोदय पाठीमागच्या काही दिवसातील विविध दैनिकांच्या बातम्या मधून महानगरपालिका क्षेत्रातील असंख्य ठिकाणी बोगस बेकायदेशीर अभिलेखावर अस्तित्वात नसणारे नियमबाह्य असंख्य पाणीपुरवठा नळ जोडण्या देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 
2. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील काही नळ जोडणी निरीक्षक पाईप निरीक्षक अथवा इतर कर्मचारी यांच्याकडून विनापरवाना अभिलेखावर नोंदी न करता नळ जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. या अभिलेखावर नसलेल्या नळ जोडण्यांना पाणीपट्टी लागू होत नसल्यामुळे महापालिकेची तथा शासनाची लाखो रुपयाचे महसुली हानी होत आहे. 
3. पाणीपट्टी भरण्यासाठी पाणीपुरवठा व नळ जोडणी तोडली असता काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कडून बोगस पावती पुस्तके छापून पावत्या दिल्या गेल्या आहेत तसेच काही ठिकाणी पाणीपट्टी भरली नसतानाही परस्पर स्वतःहून नळ जोडणी पुन्हा करण्यात आलेली आहे असाही सदर बातम्यांमध्ये उल्लेख आहे. 
4. एकंदरीतच सरासरी पाणीपट्टीच्या शासकीय उत्पन्नापैकी सुमारे 20 टक्के महसुली उत्पन्नच महापालिकेला प्राप्त होत आहे असे खेदाने म्हणावे लागते. हेच महसुली उत्पन्न जर पूर्ण क्षमतेने 100% वसूल झाले तर संपूर्ण महानगर पालिका क्षेत्रातील जनतेला आता मिळणाऱ्या पाण्याच्या दुप्पट पाणी आहे त्या खर्चाने शाश्वत पद्धतीने वितरित करता येईल असे आमचे प्राथमिक निरीक्षण आहे. 
या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने आम्ही खालील उपाय योजनांची आपणापुढे मांडणी करत आहोत. 
१ येथून भविष्यात देण्यात येणारे सर्व नळ कनेक्शन हे संगणकीय प्रणालीमार्फत देण्यात यावेत यासाठी एक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात यावी ज्यामध्ये कुटुंबासाठी घरगुती वापरासाठी व व्यापारी तत्त्वावर पाणीपुरवठा  मागणी असे विभाग करण्यात यावेत. 
2. भौगोलिक दृष्ट्या विभाग करून अथवा वार्डनिहाय यामध्ये नवीन जोडणी देखभाल दुरुस्ती व पाणी चोरीची तक्रार यासाठी वेगवेगळे मेनू देण्यात यावेत. तक्रार करणाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात यावी व तक्रारीची दखल घेतल्यानंतर त्याचा अहवाल दिल्यानंतरच तक्रार बंद करण्यात यावी. तक्रार खोट्या पद्धतीने बंद झाली असे वाटल्यास प्रथम अपील सिटी इंजिनियर कडे व द्वितीय माननीय आयुक्त साहेबांच्याकडे करण्याबद्दल सोय असावी. 
3.पाणीपट्टी चुकवणारी बोगस नियमबाह्य व नोंदणी नसलेली नळ कनेक्शन उघडकीस आणण्यासाठी सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात यावी.
 २. सदरची मोहीम हे त्रयस्थ यंत्रणेमार्फत घेण्यात यावी ज्यामध्ये जनतेचे प्रतिनिधी, पोलीस अधिकारी, त्रयस्थ पाणीपुरवठ्यामधील तज्ञ अथवा अभियंते असावेत .
३. सर्वात महत्त्वाचे मोहीम करताना याचे व्हिडिओ शूटिंग सलग करण्यात यावे फोटो काढण्यात यावेत हे फोटो व व्हिडिओ शूटिंग read only स्वरूपाचे असावे म्हणजे ते एडिट अथवा डिलीट येणार नाही. सदर फोटो व व्हिडिओ महापालिकेच्या संकेतस्थळावर जनतेसाठी खुले असावेत. 
४. बेकायदा विना परवानगी पाणीपुरवठा नळ कनेक्शन दिले असल्यास बोगस पावती पुस्तके छापलेली असल्यास अथवा पाणीपट्टी अदा करूनही कर्मचाऱ्यांनी भरले नसल्यास अथवा इतर नियमबाह्य गोष्टी घटना घडलेल्या असल्यास त्यांची चौकशी वार्ड निहाय सर्वेक्षण निरीक्षण करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी. फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. 
5.इमारतीच्या अथवा घराच्या बांधकामाला एनओसी देताना घरपट्टी पाणीपुरवठा व विद्युत विभागाकडील नादेय प्रमाणपत्र आवश्यक करावे बंधनकारक करावे अनेक इमारतीची नळ जोडणी पाणीपट्टी भरणा न केल्यामुळे महानगरपालिकेच्या शासकीय महसुलाची हानी झालेली आहे. 
6. दोषींना, नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार बचावाची संधी द्यावी परंतु कोणत्याही परिस्थितीत क्षमापित करण्यात येऊ नये
7.शासकीय महसुलाचे हानी थांबवण्यासाठी व महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी वार्डनिहाय अचानक तपासण्याची मोहीम हाती घेणे आवश्यक आहे.
8.पाणी मीटर बंधनकारक केल्यास पाण्याचा अनावश्यक वापर टाळण्यास मदत होईल परंतु यासाठी कोणत्याही प्रकारचे कंपनी टेंडर न काढता जनतेसाठी तीन चार कंपन्यांचे चे पाणी मीटर पैकी एक खरेदी करण्यासाठी पर्याय देण्यात यावेत. प्रायोगिक तत्त्वावर प्रथम नवीन आणि अनेक मजली इमारतींना हे बंधनकारक करण्यात यावे व नंतर महानगरपालिका क्षेत्रामध्ये वार्डनिहाय लागू करण्यात यावे. 
महोदय जनतेतील अनेक अनुभवी लोकांशी झालेल्या साधक-बाधक चर्चेतून उपरोक्त मुद्दे आम्हाला प्राप्त झालेले आहेत आपण याचे अवलोकन केल्यास तथा टप्प्याटप्प्याने सुधारणा लागू केल्यास महानगरपालिकेला अध्यापन मिळालेले लाखो रुपयांचे पाणीपट्टीचे उत्पन्न प्राप्त होईल नळ जोडणी देखभाल दुरुस्ती योग्य पद्धतीने नियंत्रित करता येईल तसेच यामधील अनिमित्त दूर होते शासनाची लाखो रुपयांची महसुली हानी टाळता येईल. 
तरी प्राथमिकतेने उपरोक्त सर्व उपाय योजना लागू करण्यात याव्यात सांगलीकर जनतेला नळ जोडणी व पाणी पुरवठा याबाबत न्याय मिळावा व सर्व अनियमितता दूर व्हाव्यात अशी प्रार्थना आम्ही सांगलीकर जनतेच्या मार्फत आपणाकडे करत आहोत. सहकार्याच्या अपेक्षेसह मनःपूर्वक धन्यवाद.
 यावेळी मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली, सचिव आदित्य ऐवाळे, सुधीर पळसुले आधी उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या