पेंढरी-चातगाव मार्ग पुन्हा बनला अपघात प्रवण

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 29/04/2024 3:16 PM



प्रतिनिधी पेंढरी,गडचिरोली:प्रशांत   
पेदापल्लीवार मो.न.९४०५३५६०७०

 *पेंढरी:* धानोरा तालुक्यातील पेंढरी ते चातगाव मार्गाची अतिशय बिकट अवस्था झाली असल्यामुळे या रस्त्यावरून मार्ग क्रमन करतांना नागरीक व चारचाकी वाहनधारकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत  आहे.
        सबंधीत विभागाने या कडे  लक्ष्य देऊन या मार्गाची दुरुस्त करावी,अशी मागणी होत आहे.
पेंढरी ते चातगाव मार्गांवर मोठे -मोठे खड्डे पडले आहेत.रात्रीच्या सुमारास प्रवास करतांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.दरवर्षी शासनाकडून या मार्गाची थातूर मातुर  डाग डुग्गी केली जाते मात्र ,कायम स्वरूपी उपाय योजना केल्या जात नाहीत,शासनाच्या दुर्लक्षीत  पणामुडे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गावर अनेक छोटे- मोठे अपघात सुद्धा  झाले आहेत.
पेंढरी - चातगाव हा मार्ग अत्यंत महत्वाचा असून या मार्गावर  दिवसभर  वाहनांची वर्दद  असते का हा मार्ग जिल्हा मुख्यालयाला जाण्यासाठी सोईचा असल्याने या मार्गांवरून दुचाकी,चारचाकी,अवजड वाहनांची रेलचेल सुरु असते.
वरील बाबींची प्रशासनाने दखल घेऊन पेंढरी चातगाव मार्गाचे नव्याने रुंनदीकरण करून डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी पेंढरी परिसरातील नागरीकांनी केली आहे.....

Share

Other News

ताज्या बातम्या