कुपवाड मुख्य रस्ता, भविष्याचा विचार करून शाश्वत पर्यायावर चर्चा व्हावी : विजय दादा खोत

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/04/2024 8:20 PM

*कुपवाड मुख्य रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरन, वाहतूक समस्या व सक्षम पर्याय*...

*बहुचर्चित कुपवाड मेन रोड ट्रीमिक्स काँक्रिटीकरण पंधरा दिवसांपूर्वी सुरू झाली व खऱ्या अर्थाने कुपवाडकारांना वाहतूक कोंडी म्हणजे काय याचा प्रत्यय आला*

*कॉंक्रिटीकरणाची सुरुवात केलेले काम एकदम संथ गतीने सुरू आहे त्याच्या दर्जा बाबत शंका व्यक्त केली जात आहे. कुपवाड मधील विविध सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते याबद्दल आवाज उठवत आहेत त्याला कितपत यश येईल हेही शंकास्पद आहे..*

*पण या सर्व प्रक्रियेमध्ये कुपवाड मधील नागरिक व व्यापारी वर्ग पूर्णपणे भरडला गेला आहे. नागरिक वाहतूक कोंडीला व व्यापारी वर्ग रस्त्याच्या कामानिमित्त केलेल्या बॅराकेटिंग मुळे पूर्णपणे अडचणीत आला आहे..*

*या सर्व प्रक्रियेमध्ये एक गोष्ट पूर्णपणे दुर्लक्षित होत आहे ती म्हणजे आज ना उद्या या रस्त्याचे रुंदीकरण होणार होते व आज जी समस्या उद्भवली ती कधी ना कधी उद्भवणार होती या सर्व गोष्टींवर पर्यायी व तेवढाच सक्षम पर्याय केव्हा मिळणार*..

*कुपवाड ची मेन रोड ची वाहतूक ही मुख्यता एमआयडीसी ची अवजड वाहतूक व कामगार वर्गाची वाहतूक आहे ही अवजड वाहतूक शहराबाहेरून एमआयडीसीला वळवणे ही आता काळाची गरज बनली आहे, व त्या दृष्टीने अहिल्यानगर ते बामनोली हा डीपी शंभर फुटी रस्ता महापालिकेने अक्वायर करणे व विकसित करणे एकदम गरजेचे बनले आहे.*

*पुढील दहा वर्षाची वाढलेली वाहतुकीचा विचार करून लवकरात लवकर हा शंभर फुटी रस्ता होणे व अवजड वाहतूक एमआयडीसी कडे बाहेरून वळवणे याशिवाय या समस्या सुटणार नाहीत*..

*त्यामुळे भविष्याचा विचार करून या प्रकारचा शाश्वत पर्यायांवर चर्चा व्हावी व अंमलबजावणी व्हावी एवढीच अपेक्षा*..🙏🙏

*विजय दादा खोत..*
*मा. अध्यक्ष कुपवाड शहर व्यापारी संघटना..*
*मा. अध्यक्ष कुपवाड शहर संघर्ष समिती..*
*संचालक कुपवाड विकास सोसायटी..*

Share

Other News

ताज्या बातम्या