निवडणुक कर्मचार्यांना इडीसी ऑर्डर त्वरीत मिळावे : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/05/2024 7:24 PM


*मा. जिल्हाधिकारी तथा मुख्य* *निवडणूक निर्णय* *अधिकारी 44 सांगली जिल्हा.* *सांगली* 

विषय: इडीसी ऑर्डर मिळण्याबाबत...
महोदय, 
सांगली 44 लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कर्मचारी आज जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर पाठवण्यात आले. त्यांचे मतदान होण्यासाठी त्यांना इडीसी(इलेक्शन ड्युटी सर्टीफिकेट) अवश्यक आहे. असा आपलाच निर्णय आहे. आज ड्युटीवर गेलेल्या बर्‍याच कर्मचाऱ्यांना इडीसी न मिळाल्यामुळे ते कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे त्यांचे मतदान व्हायचे आसेल तर तातडीने त्यांना इडीसी मिळण्याबाबत आपल्या स्तरावरून प्रयत्न करावेत ही विनंती.

सतीश साखळकर 
 उमेश देशमुख 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

प्रशासनाकडून मतदारांना अजुन ही मतदान सिल्प मिळालेल्या नाहीत  त्यासाठी आमच्या भागातील BLO यांच्या सोबत आमच्या भागातील मतदान स्लिप वाटण्यासाठी व मतदान करण्यासाठी जागृती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत
प्रशासनावर आरोप करताना सुधा एक नागरिक म्हणून सुधा आम्ही आमची जबाबदारी पार पाडत आहोत.

सतीश साखळकर ,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या