सांगली १०० फुटी रोड, भोबे गटार स्वच्छतेची मोहीम अंतिम टप्प्यात...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/05/2024 2:52 PM

दोन दिवसात ५२ टन प्लास्टिक मिश्रित कचरा  उठाव केला -- वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बारगिर 

पावसाळी पूर्व नाले सफाई ,स्वच्छता मोहीम म्हणून मा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त वैभव साबळे , डॉ रवींद्र ताटे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका क्षेत्रात कार्यरत आहे, 
 सांगली मिरज कुपवाड महापालिका कार्यक्षेत्रात सांगली येथील  शंभर फुटी रोड भोबे मोठी गटार स्वच्छतेची मोहीम दिनांक  ८/५/२०२४ रोजी  पासून आज अखेर सुरू करण्यात आली आहे .
सदरची गटार ही शहरातील  सांडपाणी वाहून नेण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावली असते , स्वच्छता आणि प्लास्टिक कचरा मुक्त करण्यासाठी  आरोग्य विभाग यांनी सदरची गटार स्वच्छता करण्यासाठी नियोजन केले आहे.
या कामी महापालिका प्रशासनाने  तीन जीसीबी  व पाच डंपर द्वारे एकूण ५२ टन प्लास्टिक मिश्रित कचरा  उठाव केला आहे.
या कामी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगीर , जिजाराम मोरे प्र स्वच्छता निरीक्षक व इसराइल मुकादम ,सफाई कामगार यांनी कामगिरी बजावली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या