अहेरी पोलीस स्टेशनला दाखल ऑनलाईन सट्टयाच्या गुन्ह्रामध्ये आणखी दोन आरोपींना अटक

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 09/05/2024 9:13 PM



  पोलीस अधीक्षक गडचिरोली  नीलोत्पल यांनी सद्या देशात आयपीएलचा सीजन सुरु असुन आयपीएलवर सुरु असलेल्या अवैध सट्टाबाजीवर आळा घालुन कठोर कारवाई करण्याचे निर्देश संपूर्ण जिल्हयातील पोस्टे/उपपोस्टे व पोमके यांना दिलेले आहेत.

त्या पाश्र्वभुमीवर दि. 27/04/2024 रोजी पोस्टे अहेरी हद्दीतील आय.पी.एल. सट्टा खेळवणारे इसम बाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश सा., उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे सा., पोलीस निरीक्षक पोस्टे अहेरी. श्री. दशरथ वाघमोडे, पोउपनि. जनार्धन काळे, पोउपनि. गवळी व पोलीस स्टॉफ सह विशेष मोहिम राबवुन मौजा अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस येथे छापा मारला असता, बनावटी अॅपच्या प्लॅटफार्मवर ऑनलाईन आय.पी.एल क्रिकेट वर सट्टयाचा खेळ खेळुन इतर लोकांना त्यावर पैसे लावुन नशिब आजमावुन आय.पी.एल सट्टा जुगार खेळ खेळवित असल्याचे दिसुन आले. घटनास्थळावरुन नामे निखील दुर्गेे व आसिफ शेख यांच्या ताब्यातुन चार मोबाईल फोन व भारतीय चलनाचे रोख 9,420/- रु असा मुद्देमाल मिळुन आला होता. 
 करिता सदर गुन्ह्राचा अधिक तपास केल्यानंतर आरोपी नामे 1) निखील मल्लया दुर्गेे, 2) आसिफ फकीर मोहम्मद शेख, 3) धंनजय राजरत्नम गोगीवार, 4) निखील गुंडावार, 5) प्रणित श्रीरामवार, 6) अक्षय गनमुकलवार, 7) फरमान शेख, 8) फरदिन पठाण, 9) इरफान ईकबाल शेख सर्व रा. अहेरी, 10) संदिप गुडपवार रा. आल्लापल्ली यांचे विरुध्द पोलिस स्टेशन अहेरी येथे अप. क्र. 126/2024 कलम 420 भादवी. सह कलम 4 व 5 महाराष्ट्र जुगार बंदी कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर सदर गुन्ह्राचा अजुन बारकाईने तपास केला असता, आणखी आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि अहेरी दशरथ वाघमोडे यांनी दिनांक 08/05/2024 रोजी तेलंगणा राज्यातून स्थानिक पोलीसांच्या मदतीने विशेष मोहिम राबवून ऑनलाईन सट्टा चालविणारा बुकी नामे 1) शेख जमशेद पाशा बशीर शेख, वय 32 वर्षे रा. बिबरा पो. दहिगाम तह. शिरपूर जि. आसिफाबाद (तेलंगणा) व बुकी नामे 2) रवि लसमय्या गडीरेड्डी वय 28 वर्षे रा. मुत्तमपेठ तह. कवटाला, जि. कुमरामभिम (तेलंगणा) यांना ताब्यात घेतले असता सदर दोन्ही आरोपी यांनी ऑनलाईन वेबसाईट प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन आय.पी.एल क्रिकेटच्या सट्टयाचा जुगार खेळवित असल्याचे दिसून आले.  यावरुन पोस्टे अहेरी येथे अप क्र. 126/2024 या गुन्ह्रामध्ये नमूद दोन्ही आरोपीतांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपीतांस नमूद कलमान्वये गुन्ह्रात अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश सा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे सा.यांच्या नेतृत्वात, पोलीस निरीक्षक पोस्टे अहेरी. श्री दशरथ वाघमोडे, सपोनि. विजय चव्हाण, मपोउपनि. करीश्मा मोरे, पोउपनि. साखरे, पोउपनि. मरस्कोल्हे सह पोहवा./लोहंबरे, पोहवा/शेंडे, पोअं/पानेम, मपोअ./कुमराम व चापोअं/सिडाम यांनी पार पाडली. यावेळी संपूर्ण जिल्हयातील नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध सट्टेबाजी पासुन दुर राहुन जर कोणी असे अवैध व्यवसाय चालवित असतील त्यांची माहिती पोलीस विभागाला देण्याचे आवाहन मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या