मिरज कलबुर्गी मिरज कायमस्वरूपात सोडण्यात यावी, आमदार सुरेश खाडेंना निवेदन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/08/2025 9:59 PM

*मा.आमदार डाँ.श्री.सुरेशभाऊ खाडे साहेब*
*मिरज विधानसभा मिरज*
*मिरज*

*विषय - आषाढी एकादशी निमित्त सोडण्यात आलेली मिरज कलबुर्गी मिरज स्पेशल कायमस्वरुपी सोडण्याची यावी* 

*महोदय,*

         *सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर किंवा मिरज कलबुर्गी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी येथील प्रवासी संघटना, सल्लागार समिती सदस्य तसेच प्रवासी व नागरिकांनी केली होती. यासाठी अनेक स्तरातून पाठपुरवठा केला होता.*

*याच मागणीच्या अनुषंगाने मध्य रेल्वे कडून पंढरपूर आषाढी एकादशी यात्रेनिमित्त सकाळच्या सत्रामध्ये 01 जुलै 2025 ते 10 जुलै 2025 च्या दरम्यान गाडी क्र.01107/08 मिरज कलबुर्गी मिरज स्पेशल ICF 14 डब्याची अशी गाडी सुरु केलेली होती.*

*मिरज येथुन पहाटे 5 वाजता निघुन कलबुर्गी येथे दुपारी 01:30 वा.पोहचत होती व परतीच्या प्रवासासाठी कलबुर्गी येथुन दुपारी 03:30 वा.निघुन मिरज येथे रात्री 11:50 वा.पोहचत असे*

*या गाडीस आरग,बेळंकी,सलगरे, कवठेमंहकाळ,लंगारपेठ, ढालगाव, जतरोड,म्हसोबाडोगंर,जावले, वासुद,सांगोला, पंढरपुर ,मोडलिंब, कुर्डुवाडी,माढा,मोहोळ,सोलापुर, अक्कलकोट,दुधनी, गाणगापुर या ठिकाणी थांबे देण्यात आले होते.*

             *हि गाडी सुरु झाल्यामुळे पंढरपुरच्या विठोबा बरोबर सोलापूर चे सिद्धेश्वर, तुळजाभवानी, अक्कलकोट चे स्वामी समर्थ तसेच गाणगापूर चे श्री दत्त यांचे दर्शन घेण्याची सुविधा झाली होती. तरी ही गाडी प्रवांशाच्या सोईची व उपयुक्त अशी असल्यामुळे ती कायमस्वरूपी चालवण्यात यावी व या गाडीस "देवदर्शन एक्सप्रेस" असे नाव देण्यात यावे.*

 *प्रवाशांचा, भक्तांचा व वारकरी यांचा योग्य तो विचार करुन सदर गाडी कायमस्वरुपी सुरु ठेवावी हि विनंती.*

*कळावे* 

*आपला विश्वासु*

*किशोर भोरावत*
 *मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य(ZRUCC)*

*संदीप शिंदे*
 *कार्याध्यक्ष रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शन*


*मा.आमदार डाँ.सुरेशभाऊ खाडे साहेब यांनी उद्या दिल्लीला जात असुन रेल्वेमंत्री मा.श्री.आश्वीनी वैष्णवजी यांची भेट घेऊन सदर गाडी चालु करण्यासंदर्भात भेट घेणार असल्याचे सांगीतले.*

Share

Other News

ताज्या बातम्या