*ग्रामस्थांच्या लसीकरणासाठी सरपंचांची गावभर पायपीट...*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 28/06/2021 10:00 AM



मोहन बोरकर खंडाळा/लोणंद

खेड बुद्रुक गावात उपक्रम सरपंच आन कडून ज्येष्ठ नागरिकांचे प्रबोधन.
गावच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत सरपंच हेच धोरण राबवित असतात. गावात करून आणि थैमान घातल्यानंतर ही लाट आटोक्यात आणण्याबरोबरच  आगामी काळात पुन्हा अशी वेळ येऊ नये. यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिकांना सरपंचांनी प्रबोधन करून लसीकरणासाठी प्रेरित केले. यामुळे लोकांचे लसीकरण शतप्रतिशत होण्यास मदत होत आहे. सरपंचांच्या या कामगिरीचे गावात लोकांकडून कौतुक होत आहे. खंडाळा तालुक्यात खेड बुद्रुक गावात कोरूना च्या दुसऱ्या लाटेत गावामध्ये रुग्ण जास्त आढळले. गावातून कोरोना हद्दपार करण्यासाठी सरपंच गणेश धायगुडे यांनी गावामध्ये कोरूना विलगीकरण कक्ष स्थापन केले व कुटुंबातील बाधित व्यक्ती ना वेगळे केले. त्यामुळे कोरूना ला अटकाव घालने शक्य झाले. आता तिसरी लाट येण्याची भीती असून त्याचे नियोजन केले आहे. गावातील 45 वर्षा वरील सर्व नागरिकांनी लसीकरण केल्यास कोरोना पासून दूर राहणे शक्य होणार आहे. त्यामुळे सरपंचांनी घर भेटी घेऊन प्रत्येक नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे याचे प्रबोधन केले. त्यामुळे लोकांमधील लसीकरणाबाबत ची भीती निघून गेली. याप्रसंगी सरपंच गणेश धायगुडे सामाजिक कार्यकर्ते किशोर वायदंडे. सचिन वायदंडे. अनिल रासकर. सुनील रासकर.व सहकारी यांनी लोकांचे प्रबोधन केले.

Share

Other News

ताज्या बातम्या