एकमेकांवर वैयक्तिक टिका करण्यापेक्षा उमेदवारांनी जिल्हयाच्या विकासावर बोलावे : लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/04/2024 12:35 PM

      सांगली लोकसभा निवडणुकी मधील वेगवेगळ्या पक्षाकडून उभ्या असलेल्या उमेदवारांनी वैयक्तिक पातळीवर एकमेकांवर टीकाटिपणी करण्यापेक्षा गेल्या कित्येक वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील अनेक विकास कामे रखडली आहेत त्यावर बोलावे असे आम्हाला वाटते.
                 शेरीन आल्यासह कृष्णा काठावरील अनेक गावांमधून नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या दूषित सांडपाण्यामुळे होणारे नदी प्रदूषण ,ड्रायपोर्ट,कवलापूर विमानतळ ,पिण्याचे शुद्ध पाणी आटपाडी जत सारख्या भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना करावी लागणारी वणवण ,शेतीच्या पाण्याचा प्रश्न ,जनावरांच्या चाऱ्याचा तुटवडा यासह इतर अनेक गोष्टींवर या उमेदवारांकडून कोणती उपाययोजना केली जाणार याबाबत उहापोह करावा .आणि जिल्ह्यातील समस्त जनतेच्या समोर जावे.असे आवाहन आम्ही लोकहित मंचच्या  वतीने करत आहोत ,मनोज भिसे 

**अध्यक्ष लोकहित मंच सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या