ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र प्राथमिक निवड,मुलाखत, शुध्दिपत्रक, मुलाखत वेळापत्रकाबाबत आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 07/05/2026 12:01 PM

नांदेड  :- जिल्‍हा सेतू समिती नांदेड मार्फत जिल्‍हयातील ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायत निहाय प्राथमिक निवड / मुलाखत / निरंक शुध्दिपत्रक  यादी, जिल्‍हा नांदेड सोमवार 11 मे 2026 रोजी  https://nanded.gov.in/  https://setusamitinanded.in/  प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे. 

तसेच मुलाखतीस पात्र ठरलेल्‍या अर्जदारांचे मुलाखत 15 मे व 16 मे 2026 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे घेण्‍याचे प्रस्‍तावित आहे. तालुकानिहाय मुलाखतीचे वेळापत्रक नांदेड जिल्‍हयाच्‍या संकेतस्‍थळावर सविस्‍तरपणे प्रसिध्‍द करण्‍यात येईल.  याबाबत कोणत्याही अर्जदारास वैयक्तिकरित्या स्वतंत्रपणे कळविण्यात येणार नाही तसेच कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही. त्यामुळे सर्व अर्जदारांनी https://nanded.gov.in/  हे संकेतस्थळ नियमितपणे पहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव सेतू समिती नांदेड यांनी केले आहे. 

Share

Other News

ताज्या बातम्या