*श्री. एकनाथ सहादू शेटे महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिर संपन्न...*
शिक्षण मंडळ भगूर संचालित श्री. एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, देवळाली कॅम्प, नाशिक येथे विद्यार्थी कल्याण मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मतदार नाव नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य भरत सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना मतदार नाव नोंदणीचे महत्त्व विशद केले. विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी डॉ. मृत्युंजय कापसे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष बोडके यांनी आपल्या मनोगतांमध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी नवतरुणांनी आपली मतदान नाव नोंदणी करून व आगामी निवडणुकीत मतदान करून सुजाण नागरिक म्हणून कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी भगूरच्या तलाठी सौ. दिपाली धनगर, बीएलओ मोहन गायकवाड, कोतवाल श्री. तुषार कुंडारिया यांनी विद्यार्थ्यांना मतदार नाव नोंदणीचे अर्ज वाटप करून नाव नोंदणीचे संपूर्ण मार्गदर्शन केले. उपस्थित पाहुण्यांचा परिचय व स्वागत राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. गायत्री हरळे, प्रा. रोहिणी जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहुल निर्मळ व आभार प्रा. सुरज गंगावणे यांनी केले.