नीरा येथे यार्ड रिमोल्डिंग कामाकरीता वीस दिवसाचा ब्लॉक, काही गाड्या उशीरा धावणार तर काही अंशताः रद्द तर काही गाड्यांच्या मार्गात बदल

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/06/2026 2:07 PM

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील  पुणे मिरज दुहेरीकरण प्रकल्पाअंतर्गत निरा यार्ड कार्यान्वित करण्यासाठी निरा यार्ड येथे  05 जून 2026 ते 25 जून 2026 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे 
 हा ब्लॉक सर्वसाधारणतः दररोज तीन तासाचा असेल व इंजिनिअरिंग सेक्शन करिता एक तासाचा असेल साधारणता दिवसातून चार तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

 या ब्लॉकमुळे कोल्हापूर पुणे व पुणे कोल्हापूर डेमु एक्सप्रेसवर जास्त परिणाम होणार असून हि गाडी काही स्थानकापर्यंतच धावेल व तिथूनच परत निघेल काही गाड्यां अर्धा ते दोन तास उशिरा धावण्याची शक्यता आहे.
 या कालावधीमध्ये काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेले आहेत.
 या ब्लॉक मुळे सर्वच जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये फरक पडणार असून प्रवाशांनी प्रवास करत असताना या मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा असे आवाहन मध्ये रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत रेल्वे प्रवासी संस्थाचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे व उपाध्यक्ष व राजेंद्र पाटील यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या