पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची कोल्हापुरातील सभा अभूतपूर्व होणार

  • APARNA PATIL (Kolhapur )
  • Upadted: 27/04/2024 12:21 AM



नागरिकांनी दुपारी ३ पर्यंत सभास्थळी आसनस्थ होणे आवश्यक

कोल्हापूर दि.२६ कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी शनिवारी कोल्हापुरात येत आहेत. कोल्हापुरातील कळंबा येथील तपोवन मैदानावर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा होत आहे. यासभेला राज्याचे मुख्यमंत्री नाम. एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री नाम. देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील आणि जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

शनिवारी सायंकाळी होणाऱ्या या सभेसाठी सुमारे १ लाख नागरिक तपोवन मैदानावर उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात आले आहे. सभेसाठी येणाऱ्या नागरिक आणि कार्यकर्त्यांनी दुपारी ३ वाजता सभेच्या ठिकाणी हजर राहून आसनस्थ होणे गरजेचे आहे. अतिमहत्वाच्या व्यक्ती कोल्हापुरात येत असल्याने पोलीस प्रशासनाकडून दुपारी १ वाजले पासूनच काही रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे तर काही मार्ग वळवण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सभेसाठी येणाऱ्या सर्व नागरीकांनी दुपारी ३ पूर्वी सभा स्थळी येणे आवश्यक आहे. पोलीस यंत्रणेने नागरीकांच्या वाहन पार्किंगसाठी पुढीलप्रमाणे व्यवस्था केली आहे. नागरिकांनी आप-आपली वाहने शिस्तबद्ध रीत्या पार्किंग करून सभा स्थळी यावे असे आवाहन पालकमंत्री नाम. हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
कोल्हापुरातील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सभा अभूतपूर्व उत्साहात होणार असून, कोल्हापूर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातूनही अनेक नागरिक नरेंद्रजी मोदी यांना ऐकण्यासाठी उस्तुक आहेत. त्यामुळे मोदी यांच्या रूपाने येणारा झंझावात या निवडणुकीतील प्रमुख टप्पा असणार आहे.


क) सभा ठिकाणी प्रवेश मार्ग

१ मा. व्हिव्हिआयपी यांचे करीता

हॉकी स्टेडीयम, इंदिरा सागर, आयटीआय मार्गे तपोवन इन गेट स्टेजच्या उजवे बाजुस

मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करीता यांचे

हॉकी स्टेडीयम, रामानंदनगर चौक, निर्मिती कॉर्नर चौक, तपोवन मैदान इन गेट डावीकडे वळुन जेल क्वार्टस लगतच्या रोड येथुन उजवीकडे वळून यशवंत लॉन, स्वामी समर्थ मंदिर येथुन तपोवन मैदान स्टेज चे डावे बाजुस

३ सभे करीता येणारे नागरीकांचे करीता

१) कळंबा, चिवा बाजार परीसरातील पाकींग ठिकाणी आपले वाहन पार्क करुन नागरीकांनी साई मंदिर जेल क्वार्टर्सच्या पाठीमागील रोडने स्वामी समर्थ मंदिर भाग्यरेखा रेसीडन्सी च्या पुढे जावुन तपोवन मैदानात जावुन डोअर फ्रेम डिटेक्टर मधुन प्रवेश

२) क्रशर चौक परीसरातील पार्कींग ठिकाणी आपली वाहने पार्क करुन देवकर पाणंद चौक, वसंत विश्वास पार्क मार्गे तपोवन मैदानात जावुन डोअर फ्रेम डिटेक्टर मधुन प्रवेश

३) क्रिडा संकुल येथे आपली वाहने पार्क करुन नागरीकांनी रेसकोर्स नाका, इंदिरा सागर, देवकर पाणंद चौक, वसंत विश्वास पार्क मार्गे तपोवन मैदानात जाबुम डोअर फ्रेम डिटेक्टर मधुन प्रवेश

४) संभाजीनगर बस डेपो येथे वाहने पार्क करुन देवकर पाणंद चौक, वसंत विश्वास पार्क मार्गे तपोवन मैदानात जावुन डोअर फ्रेम डिटेक्टर मधुन प्रवेश

सभेसाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंग सुविधा व पार्किंग ठिकाणी जाणेचा मार्ग

अनं

तालुका

०१

भुदरगड, आजरा

पार्कीग ठिकाणी जाणेचा मार्ग

कळंबा मार्गे

पाकींग ठिकाण

१. कळंबा भाजी मंडई २. जेल भिंती लगतचे पाकींग

चिवा मंदिर ते साई मंदिर जाणारे

०२

Share

Other News

ताज्या बातम्या