आता १३ व्यवसायसाठी महापालिकेकडून एनवोसी परवानगीची आवश्यकता नाही.
महापालिका आयुक्त मा. सत्यम गांधी यांचा व्यवसाय धारकांना दिलासा
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका
व्यवसाय धारकांना या व्दारेव सूचित करण्यात येते की महापालिकेत क्षेत्रामध्ये 13 व्यवसाय धारकांना व्यवसाय करण्यासाठी मनपाच्या परवानगी ची गरज असणार नाही, असे आदेश मा सत्यम गांधी आयुक्त यांनी दिले आहेत.
केवळ सदर व्यवसाय धारक यांनी इमारतीमध्ये व्यवसाय करत आहेत त्या भोगवटा प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे,
त्या मध्ये
१)बचतगट
२) पोषणआहार
३) नेचर थेरेपी,
४) फिजोथेरपी
५) योगा
६) पंचकर्म
७) कपडे
८) भांडी
९) ब्युटी पार्लर
१०)गिफ्ट शॉपी
११) पुस्तके
१२) आहार तज्ञ
१३) टेलरिंग
या व्यवसाय साठी मनपाची परवानगीची आवश्यकता असणार नाही, असे उपआयुक्त निखल जाधव यांनी माहिती दिली आहे,
अन्य व्यवसाय बाबत लवकरच धोरण निश्चित करण्यात येणार आहे.