मुंबई येथील मराठा आरक्षण आंदोलनाचा काल समारोप झाला
का आंदोलन संपवण्यासाठी कुरापती झाल्या...?
बऱ्याच समाज बांधवांचे उपोषण संपल्यानंतर फोन आले नेमकं कोणत्या मागण्या मान्य झाल्या त्याचा लाभ कोणाकोणाला होणार असे बरेचसे प्रश्न होते
सर्वप्रथम आंदोलन निर्णायक टप्प्यावर संपले हे एका अर्थाने सकारात्मक दृष्टिकोनातून मनोज दादा जरांगे यांची प्रकृती व त्यांचा सहवास आपल्याला हवा आहे या दृष्टिकोनातून बघितले पाहिजे
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आंदोलन वेगवेगळ्या कपटनीतीने कटकारस्थान करून मराठा समाजाला कसा अडचणी आणता येईल यासाठी प्रयत्न झाले.
हे तुम्हा आम्हाला जसे समजते तसे जरांगे पाटील यांना सुद्धा लक्षात येत होते राज्य सरकारने कशा पद्धतीने आंदोलन हाताळले हे आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे
आता राहिला प्रश्न हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट औंध गॅझेट या सगळ्यांचा कायदेशीर मार्गाने अभ्यास करणे आवश्यक आहे
मग एडवोकेट असीम सरवदे असतील माजी न्यायमूर्ती बी जे कोळसे पाटील असतील मराठा आरक्षण बाबत कायदेशीर लढाई लढणारे विनोद पाटील असतील आपला प्रशांत भोसले असेल व अन्य विश्लेषक असतील ह्या सगळ्यांचा विचार व सद्य परिस्थितीचा अभ्यास व ह्या अगोदरचा अभ्यास व योगदान महत्त्वाचे आहे त्यामुळे कोणत्याही मत मतांतरावर समाजाच्या उपयोगाच्या दृष्टिकोनातून बघितले पाहिजे असे वाटते
याचा दूरगामी परिणाम समाजासाठी खास करून मराठवाडा विदर्भातील समाज बांधवांना होईल व झालाच पाहिजे याबद्दल कोणाचीही दुमत नाही
आता राहिला प्रश्न पश्चिम महाराष्ट्र कोकण येथील समाज बांधवांचा
या निर्णायक टप्प्यावर आंदोलन संपवताना उर्वरित महाराष्ट्रासाठी मोफत शिक्षण अथवा ओबीसींच्या धरतीवर शैक्षणिक सुविधा याबाबत विचार होणे आवश्यक होते मात्र त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही मग सारथी मधील विषय असतील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीत व्याज परतावा असेल किंवा अन्य जाचकाठी असतील समाजातील मुला मुलींचे हॉस्टेल असेल अन्य शासकीय जीआर मधील त्रुटी असते याबाबत विचार विनिमय व सुधारणा करणे आवश्यक आहे
सदर आंदोलनाच्या आनंद उत्सव साजरा करणे बाबत मत मतांतरे आहेत ते असणारच
प्रत्येक राजकीय पक्षात मराठा समाज विखुरलेला आहे मग महाविकास आघाडी समर्थक मराठा वेगळा महायुती समर्थक मराठा वेगळा त्यामुळे प्रत्येकाला आपले बस्तान व आपल्या अस्तित्व टिकवण्यासाठी नेत्यांचे पक्षांचे गोडवे गायला लागतात ते सुद्धा त्यांच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे असेल आणि राहणार आहे मात्र समाज म्हणून बघताना ओबीसी मधील सर्व राजकीय पक्षातील नेते असतील कार्यकर्ते असतील हे आपल्या आरक्षणाला धक्का लागत असताना किंवा आपल्या मागण्या करताना पक्ष व नेता फाट्यावर बसवतात त्यांचे अभिनंदनच आहे आणि कौतुक आहे
मात्र मराठा प्रत्येक पक्षातील समाजावर होणारे अन्याय विरोधात नेत्याला पक्षाला फाट्यावर बसवणार आहे का का त्यांचे कौतुक करणार आहे हा महत्त्वाचा विषय आहे तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत प्रत्येकाचे मनसुबे वेगळे आहेत त्यामुळे ते व्यक्त होणार नाही निदान जे व्यक्त होतात जे काम करतात त्याबाबत तरी सकारात्मकता दाखवावी एवढीच मापक अपेक्षा आहे
काही माध्यम काही वृत्तपत्रे वास्तव दाखवतात काहींच्या वर दबाव असतो हे वास्तव आहे हे आता नाकारून चालणार नाही....
त्यामुळे लढा अजून संपला नाही समाजाच्या विविध प्रश्नांसाठी समस्यांच्यासाठी आपल्याला काम करावेच लागणार आहे
सतीश साखळकर सांगली जिल्हा
एक मराठा लाख मराठा