आवाहन

BREAKING NEWS

मुख्यमंत्री सहायता निधीतून गरजु रूग्णास ५० हजार रू ची आर्थिक मदत , वैध्यकीय कक्ष जिल्हाप्रमुख अमोल पाटील यांचा पाठपुरावा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 6/2/2023 9:43:43 AM


शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सांगली जिल्हा प्रमुख अमोल पाटील यांचा पाठपुरावा

मुख्यमंत्री सहायता निधीतुन वैशाली जगताप राहणार पलूस या रुग्णाला पन्नास हजार रुपयाची वैद्यकीय आर्थिक मदत दिनांक:  ०१-०६-२०२३ वैशाली जगताप राहणार पलूस हे संजीवनी हाॅस्पिटल नाशीक येथे नी रिप्लेसमेंट वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले रुग्णाची आर्थिक परिस्थिती अडचणीची असताना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख अमोल पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे सर यांना संपर्क साधुन मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले  मुख्यमंत्री सहाय्यता निधी तुन आर्थिक मदत मिळावी यासाठी अर्ज करुन मुख्यमंत्री वैदिक वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश दादा याना संपर्क साधला आणि पाठपुरावा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून या रुग्णांसाठी शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी आर्थिक मदत पन्नास हजार रुपये मिळवून दिली. या बद्दल रुग्णाचे नातेवाईक  यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्यचे मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे साहेब, मुख्यमंत्री वैद्यकीय साह्यता निधी प्रमुख मंगेश चिवटे सर, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मा रामहरी राऊत सर, मुख्यमंत्री सहायता निधीचे स्वरूप काकडे, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव (बापू ) पवार तसेच महेंद्र भाऊ चंडाळे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख अमोल पाटील यांचे आभार मानले .


Share

Other News

ताज्या बातम्या