प्रसिद्ध विडंबनकार संजय आहेर यांच्या विडंबन कवितांना विजयनगर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 19/09/2026 10:34 AM

प्रसिद्ध विडंबनकार संजय आहेर यांच्या विडंबन कवितांना विजयनगर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
​भगूर/वार्ताहर :-
"विडंबन म्हणजे केवळ विनोद नसून, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील अनागोंदीवर कवितेच्या माध्यमातून अंजन घालून उचललेले एक सुधारणावादी पाऊल आहे," असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व विडंबनकार संजय आहेर यांनी केले.
​विजयनगर येथील शहा गार्डन इस्टेटमधील विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने आयोजित विशेष विडंबन कविता कार्यक्रमात ते बोलत होते.
​सुमारे दोन तास रंगलेल्या या कार्यक्रमात संजय आहेर यांनी 'स्ट्रॉबेरी' तसेच 'आजकालची सामाजिक परिस्थिती' यांसारख्या विषयांवर मार्मिक व प्रभावी विडंबन कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. याच कार्यक्रमात कवी बाळासाहेब गिरी यांनी आई, मुलगी आणि वडील या कौटुंबिक नात्यांवर आधारित भावस्पर्शी कविता सादर केल्या.
​मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतिथींचे स्वागत स्वप्नील घोरपडे व स्वप्नील आव्हाड यांनी केले. या सोहळ्यास ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, कवी रवींद्र आहेर यांच्यासह सोसायटीतील अनेक नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व नियोजन प्रशांत कापसे यांनी केले. उपस्थितांच्या भरघोस प्रतिसादात हा काव्यसंध्येचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.

Share

Other News

ताज्या बातम्या