*भगूर नगरपरिषदेवर दुजाभावाचा आरोप, मुख्याधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण*

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 17/09/2026 4:00 PM

*भगूर नगरपरिषदेवर दुजाभावाचा आरोप, मुख्याधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण*

* भगूर - प्रतिनिधी*

भगूर नगर परिषदेमध्ये बॅनर हटविण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. सत्ताधारी गट केवळ विरोधकांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख विक्रम सोनवणे यांनी केला आहे.

दिलेल्या माहितीनुसार, भगूर नगर परिषदेमध्ये सत्ताधारी गट केवळ विरोधकांना डिवचण्याचे काम करीत असून, आमचा कोणत्याही विकासकामांना विरोध नसताना शहरातील बॅनर हटविताना नगर परिषद प्रशासनाकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे.

नगर परिषदेने बॅनरबाबत धोरण ठरविले ते योग्यच आहे, परंतु त्यात केवळ विरोधकांनाच लक्ष्य का केले जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विरोधी पक्षाच्या गटाच्या नगरसेवकांचे बॅनर काढण्यात आल्याचे ते म्हणाले.

*मुख्याधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण*

या आरोपांवर भगूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

ते म्हणाले, "दि. १० सप्टेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार नगर परिषद हद्दीत कोणत्याही ठिकाणी, रस्त्यावर, चौकात किंवा नगर परिषदेच्या मालकीच्या जागेवर बोर्ड, बॅनर, होर्डिंग, पोस्टर लावण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. प्रचलित नियम व मंजूर दरानुसार शुल्क भरूनच परवानगी घ्यावी लागेल. अन्यथा बोर्ड हटवून कायदेशीर कारवाई केली जाईल.

"शहरात लावण्यात येणारे बॅनर, पोस्टर याबाबत नियमावली ठरवण्यात आलेली आहे. ज्यांचे कार्यक्रम व दिलेली वेळ संपलेली असते, असे बॅनर व पोस्टर नगर परिषद नियमानुसार हटवले जातात, यात कोणताही भेदभाव केला जात नाही," असे डॉ. पटेल यांनी स्पष्ट केले.

सोनवणे म्हणाले - लोकशाही मार्गाने संघर्ष करू
"गावाच्या विकासाच्या आड आम्ही येणार नाही, पण सत्ताधाऱ्यांनी खिलाडूवृत्तीने कामकाज केले पाहिजे. नियम सर्वांसाठी सारखेच असताना त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे, यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने संघर्ष करू," असा  विक्रम सोनवणे यांनी सांगितले दरम्यान सत्ताधारी गटाचे नगरसेवक विशाल बलकवडे यांनी सांगितले की आम्ही कोणत्याही कार्यक्रमात दुजा भाव करत नाही नुकतेच स्मशानभूमी भूमिपूजनाचा व तलाठी कार्यालय लोकार्पणाचा सोहळा पार पडला  आम्ही विरोधी गटाच्या नगरसेवकांना  कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आमंत्रणही दिले होते परंतु विरोधी गटाचे नगरसेवक कार्यक्रमास कोणीही उपस्थित राहिले नाही

Share

Other News

ताज्या बातम्या