शहरातील मोकाट कुत्र्यांचा थेट आयुक्तांना फटका

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/10/2024 8:50 PM

काल शिवाजी मंडई येथे भाजीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे बस खाली पाय सापडून एका वृद्धाचे पाय गेले आज आयुक्तांच्या गाडीसमोर अचानक कुत्रे आल्याने ड्रायव्हरने गाडी वळवली व त्यामुळे गाडी खांबावर आढळून आयुक्तांच्या डोक्याला मार लागला अतिक्रमणांची आणि रस्त्याच्या कुत्र्यांची समस्या ही आयुक्तांना आता तरी पटली असेल का?
काही व्यवसायांच्या दृष्टिकोनातून भावनिक समस्या असतील मात्र विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार असतील त्या सर्वांनी मिळून प्रत्येकाचं पोट पाणी चाललं पाहिजे का तर शंभर टक्के आम्ही सहमत आहोत मात्र अशामुळे कुणाचं तर जीवावर बेत असेल तर आपण सर्वांनी विचार करण्याची वेळ आता आलेली आहे असे मला वाटते 
आयुक्त साहेबांना काही मोठी दुखापत झाली नाही ह्याबद्दल समस्त शहरवासीय समजून घेत आहेत मात्र यातून काही वाईट घडले असते तर ती किती दुर्दैव असेल असो सर्वच घटकांनी ह्या माध्यमातून अनुभवातून शिकावे आणि आपल्या शहराला शिस्त लावून ज्यांचे व्यवसाय अतिक्रमण मध्ये येतात त्यांनी सुद्धा फेरीवाला धोरणाला अनुसरून आपले व्यवसाय सुरक्षित करावेत व शहरवासीयांची पण काळजी करावी.
ह्या घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांनी सुद्धा मग ते कोणत्याही पक्षाचे असून देत त्यांनी सुद्धा याबाबत लक्ष दिले पाहिजे 
आम्ही नागरिक जागृती मंचच्या वतीने गेल्या कित्येक वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत प्रयत्न करत आहोत यश येत नाही त्याला कारण फक्त आणि फक्त मतांचे राजकारण आहे असे मला वाटते राजकारणाच्या पलीकडे जाऊन शहर व आपल्या शहरातील घटक यांचे जीवनमान व्यवसाय या सगळ्यांचे विचार करून आपण मध्यस्थी मार्ग काढू शकतो मात्र त्यासाठी सकारात्मकता पाहिजे असे वाटते...
धन्यवाद...

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या