अनिल मोहिते सर यांच्याकडून अहिल्यानगर, कुपवाड येथील खेळाडूंना किटचे वाटप

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/03/2026 9:28 AM

कुपवाड : येथील अहिल्यानगर, विजयनगर, प्रकाशनगर परिसरातील खेळाडूंना जि. प. शाळा अहिल्यानगर विजयनगर येथे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री. अनिल मोहिते सर यांचेकडून स्पोर्ट किट वाटप करण्यात आले.
अनिल मोहिते सर हे देवदान बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून संस्थेच्या माध्यमातून ते अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्र १ मधील अहिल्यानगर येथे खो - खो व कब्बड्डी च्या मुलींना स्पोर्ट किट वाटप करण्यात आले. यावेळी अनिल मोहिते सर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मा. आकाश आण्णा गोसावी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन जि. प. शाळा अहिल्यानगर चे शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मा. अमिन शेख यांनी केले होते.
सदर कार्यक्रम साठी सामाजिक कार्यकर्ते आकाश आण्णा गोसावी, देवदान सेवाभावी संस्थेचे सेक्रेटरी प्रा. अजिंक्य मोहिते, प्रा. राकेश ब्याकुडे, श्री. बसाप्पा कोरती, श्री. सुरेश पुजारी, श्री. प्रमोद भोसले, श्री. वारे, प्रशिक्षक श्री. सचिन सावंत तसेच भागातील नागरिक, खेळाडू उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या