आज पहाटे पाच च्या दरम्यान सांगलीतील एम बी लिंक या ट्रॅव्हल ला तरुण भारत व्यायाम मंडळ समोर ट्रॅव्हलला आग लागली ड्रायव्हर आणि त्यांच्या साह्यकाला लक्ष्यात आल्या आल्या त्यांनी झोपेत असलेल्या सर्व प्रवासी यांना त्यांच्या सामनासह सुरक्षित बाहेर काढले त्यामुळे जीवित हानी झाली नाही तसेच वेळेत मनपा अग्निशामक दलाच्या लोकांनी आग आटोक्यात आणली
ट्रॅव्हल्स ड्रायवर आणि सहायक आणि मनपा अग्निशामक दलाच्या कर्मचारी यांचे आभार ...
मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रात आणि अन्य राज्यात मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स ना आग लागण्याचे प्रमाण वाढले आहेत त्याची चौकशी करण्यात आली पाहिजे व त्यावरील उपाययोजना केल्या पाहिजेत.
खास करून नवीन टेक्नॉलॉजी वापरली जात आहे त्यात काही दोष आहेत का..? याचा अभ्यास केला पाहिजे आणि अशा घटना टाळल्या जाव्यात या बाबत कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती आहे.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.