लोकहित मंच इफेक्ट, मनपाकडून तात्काळ दखल...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/03/2025 4:04 PM

📢 लोकहित मंचाची तात्काळ दखल – नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण कार्य!

सांगली स्टेशन रोडवरील एस एफ सी मेगा मॉलसमोर अनेक दिवसांपासून साचलेल्या कचऱ्याच्या समस्येची लोकहित मंचने घेतलेली दखल आणि केलेल्या मागणीला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने तात्काळ प्रतिसाद दिला.

सांगली महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त, तसेच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा. रविकांत अडसूळ साहेब आणि उपायुक्त मा. वैभव साबळे साहेब यांनी त्वरित पावले उचलत हा कचरा उचलण्याची कार्यवाही केली. त्यांच्या या जलद निर्णयक्षमतेमुळे परिसर स्वच्छ करण्यात आला आणि नागरिकांना दिलासा मिळाला.

लोकहित मंच, सांगली महानगरपालिकेच्या संपूर्ण आरोग्य विभागाचे, स्वच्छता निरीक्षकांचे आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानते.

➡ सकारात्मक प्रशासन आणि तत्पर कार्यसंस्कृतीचा हा उत्तम आदर्श ठरला आहे!
➡ महानगरपालिकेच्या टीमने दाखवलेली जबाबदारी आणि तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे!

✍ - मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या