पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जेजुरी येथे मल्हार गडावर धर्म रक्षक अहिल्यादेवी होळकर या चित्रपटाच्या प्रदर्शना ची तारीख जाहीर होणार असून .त्या निमित्त सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच सदर चित्रपटाची प्रमुख कलाकार अश्विनी महांगडे उपस्थित राहणार आहेत .. या चित्रपटाची निर्मिती लयभारी प्रोडक्शन अंतर्गत सोमा शिंदे यांनी तसेच लेखन दिग्दर्शन सुशांत सोनवले यांनी केले आहे ..होळकर शाही वरील पोवाड्याचं लेखन सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी तर गायन सुप्रसिद्ध शाहीर नंदेश उमप यांनी केले आहे.
अशी माहिती मल्हार क्रांती सेवा संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तानाजी व्हनमाने यांनी दिली.