❓ सांगली भयमुक्त, नशामुक्त, गुन्हेगारीमुक्त झाली का?
➡️ अजूनही गुन्हे, नशेचे अड्डे व भीतीचे वातावरण दिसते.
✈️ कवलापूरला विमानतळ निर्माण झाला का?
➡️ घोषणा झाल्या, पण प्रत्यक्ष विमानतळ अद्याप नाही.
🛣️ रस्ते खड्डेमुक्त झाले का?
➡️ पावसात रस्ते की खड्डे, हे ओळखणं कठीण झाले आहे.
🐕 मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सुटला का?
➡️ हल्ले सुरूच आहेत, ठोस उपाय दिसत नाहीत.
🚰 शेरीनाल्याचा प्रश्न सुटला का?
➡️ दुर्गंधी, डास व आजार अजूनही कायम आहेत.
💧 स्वच्छ पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटला का?
➡️ अनेक भागात अशुद्ध व अपुरा पाणीपुरवठा आहे.
🌊 पुराच्या परिस्थितीत योग्य नियोजन झाले का?
➡️ दरवर्षी तोच प्रश्न, तोच निष्काळजीपणा.
- मनोज भिसे,
अध्यक्ष:- लोकहित मंच सांगली.