सोयाबीन खरेदीच्या नोदिणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ सातारा, वडूज व वाई येथेही खरेदी केंद्र सुरू करण्यास शासनाची मान्यता

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 11/01/2026 10:56 AM



आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे )

सातारा दि. : शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना नाव नोंदणी करण्यासाठी 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच सातारा व वडूज येथे खरेदी केंद्र सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी दिली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळण्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी दिनांक 30 ऑक्टोबर 2025 पासून सुरु करण्यात आली आहे. प्रत्यक्षात खरेदी प्रक्रिया दिनांक 15 नोव्हेंबर 2025 पासून सुरु करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी शासनाकडून हमीभाव शेतमाल खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याची मुदत दि. 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. शासनाने सन 2025-26 वर्षाकरिता निश्चित केलेल्या आधारभूत किमतीने 5 हजार 328 रुपये प्रती क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पणन महासंघ व नाफेडमार्फत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, सातारा, फलटण, वाई, व कराड येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाना, मसूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेस केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता दिलेली असून नव्याने वडुज ता. खटाव येथे खरेदी विक्री संघ, सातारा येथे जिल्हा मध्यवर्ती ग्राहक संघ लि. सातारा व कवठे ता. वाई येथे समृध्दी सहकारी संस्था कवठे ता. वाई या तीन केंद्रास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्रांची संख्या १ झाली आहे. कोरेगांव, फलटण, वाई व मसूर येथील केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली असून आतापर्यंत कोरेगाव केंद्रावर 339 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 333 शेतकऱ्यांची 4070 क्विंटल, फलटण केंद्रावर 211

शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 192 शेतकऱ्यांनी 2347 क्विंटल, वाईकेंद्रांवर 175 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 148 शेतकऱ्यांची 1520 क्विंटल व मसूर केंद्रावर 92 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 82 शेतकऱ्यांची 988 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. सातारा जिल्हयात एकुण 755 शेतकऱ्यांकडुन एकुण 8926 क्विंटल खरेदी झालेली आहे. तसेच पणन मंडळाकडुन मंदप्रभा फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. शिखर शिंगणापुर, ता. माण येथे, संकल्पपुर्ती अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी कोरेगाव तर्फे हिवरे ता. कोरेगाव, येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी तर्फे वर्धनगड (पुसेगावजवळ) ता. खटाव, जि. सातारा या केंद्रावर सोयाबीन खरेदी चालू आहे.

शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीकरीता आपल्या गावाजवळील नाफेड, एनसीसीएफ, पणन मंडळाच्या नजिकच्या शेतमाल खरेदी केंद्रावर जाऊन 7/12 उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक घेवुन प्रथम आपल्या सोयाबीन शेतमालाची नोंदणी करून घ्यावी. नोंदणी ही ऑनलाईन पध्दतीन े पॉझ मशिनव्दारे करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, चालु वर्षाचा 7/12 उतारा पीकपेरा इ. कागदपत्रांसह नोंदणीकरीता प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी हनुमंत पवार जिल्हा पणन अधिकारी (DMO) संबंधित खरेदी विक्री संघ, तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही श्री. सुद्रिक यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या