नांदेड : जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्याकडे आपल्या आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या माहितीबाबतचे माहे डिसेंबर २०२५ अखेरचे ई-आर- १ (ER-1) त्रैमासिक विवरणपत्र जानेवारी/फेब्रुवारी 2026 च्या मुदतीत या कार्यालयाचे संकेतस्थळ www.mahaswayam.gov.in वर भरावयाची मुदत आहे.
डिसेंबर- २०२५ अखेरचे ईआर १ (ER 9) त्रैमासिक विवरणपत्र भरल्याची प्रत माहे जानेवारी २०२६ च्या वेतन देयकसोबत जोडल्याशिवाय वेतन देयके स्विकारली जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
जिल्ह्यातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना या कार्यालया मार्फत युजर आयडी व पासवर्ड यापूर्वीच कळविण्यात आलेले आहेत. तसेच सर्व कार्यालयांनी आपले ईमेल आयडी, फोन नंबर, पॅन नंबर, टॅन नंबर नोंदवून आपली प्रोफाईल अद्यावत करावी. या बाबत काही अडचणी आल्यास या कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 02462-251674 वर संपर्क करावे, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नांदेड यांनी केले आहे.