सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या १८ मार्चला होणाऱ्या महासभेकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 'समुद्र' कंपनीच्या ४२० कोटींच्या वादग्रस्त एलईडी कंत्राटाबाबत कायदेशीर अभिप्राय आयुक्तांकडे सादर झाला असून, आता प्रत्यक्ष कारवाईची वेळ आली आहे.
🔴 आमच्या प्रमुख मागण्या:
ठराव तात्काळ रद्द करा: सर्वपक्षीय नगरसेवकांनी वैयक्तिक मतभेद आणि राजकीय हितसंबंध बाजूला ठेवून, जनहितासाठी या कंपनीचा वादग्रस्त ठराव महासभेत तात्काळ रद्द करावा.
सखोल चौकशीचा प्रस्ताव: केवळ ठराव रद्द करून हे प्रकरण थांबवता कामा नये. या प्रकल्पातील तत्कालीन संबंधित अधिकारी आणि संगनमत करणाऱ्यांची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य शासनाकडे अधिकृत प्रस्ताव पाठवावा.
जनतेच्या पैशाचे रक्षण: सांगलीच्या जनतेच्या कराचा कष्टाचा पैसा अशा वादग्रस्त कंत्राटांत वाया जाऊ नये, हीच आमची ठाम भूमिका आहे.
"सांगलीच्या उज्वल भविष्यासाठी आणि भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी आता मागे हटून चालणार नाही. एलईडी प्रकल्पातील 'अंधार' दूर करून सत्य समोर आलेच पाहिजे!"
लोकहित मंचच्या वतीने आमचे या संपूर्ण प्रकरणावर आणि होणाऱ्या महासभेवर बारीक लक्ष आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ!
आपला नम्र,
मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली