जिल्हा परिषद प्रशासनाने आर्थिक वर्षाच्या शेवटच्या काळात विविध योजनांवर जो कोट्यवधी रुपयांचा निधी घाईगडबडीत खर्च केला आहे, त्याबद्दल जनमानसात मोठी शंका निर्माण होत आहे. कोणतीही योजना राबवताना तिची गरज, दर्जा आणि योग्य पद्धत तपासणे गरजेचे असते. मात्र, मार्च अखेरच्या नावाखाली घाईघाईने निर्णय घेऊन निधी खर्ची पाडण्यात आला आहे.
ग्रामपंचायतींसाठी बसवलेली सोलर सिस्टीम खरोखर आवश्यक होती का?
समाजकल्याण विभागाकडील सौर पथदिवे खरेदी प्रक्रिया योग्य आहे का?
जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या शाळांमध्ये बसवलेले सीसीटीव्ही आणि इंटरॅक्टिव्ह पॅनेल्स खरोखरच दर्जेदार आहेत का?
या सर्व संशयास्पद बाबींवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सभापतींनी गांभीर्याने लक्ष घालण्याची नितांत गरज आहे. लोकहित मंच, सांगलीच्या वतीने आमची स्पष्ट मागणी आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. जनतेचा पैसा कुठे आणि कसा खर्च झाला, याचा हिशोब मिळायलाच हवा!
आपला नम्र,
मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली.