नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातुन महागडे हरवलेले व चोरीस गेलेल्या मोबाईल बाबत विशेष मोहीम राबवणेबाबत मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी वसंत सप्रे पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन यांना आदेशीत केले होते. त्यानुसार सायबर पोलीस स्टेशन नांदेड, स्थागुशा आणि जिल्ह्यातील सर्व पोस्टे यांचे पथक तयार करुन हरवलेले व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात आली होती.
सदर मोहिमेत जानेवारी २०२६ पासून आजपावेतो नांदेड जिल्ह्यातील हरवलेले व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळ्या ठिकाणावरून घेऊन एकूण ३०३ मोबाईल किंमत ४६,०३,०००/-रुपयाचे हस्तगत करण्यात आले, त्या सर्व मोबाईलचे आज एकत्रितरीत्या पालकमंत्री मा. श्री. अतुल सावे यांच्या हस्ते मिशन सहयोग व मिशन समाधान अंतर्गत वाटप करण्यात आले. शोध झालेल्या मोबाईलचे IMEI क्रमांकांची माहिती नांदेड पोलीस दलाचे "Nanded Police" या Facebook Page वर टाकण्यात आली आहे.
तसेच मा. पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२५ मध्ये ८०० मोबाईल अंदाजित रक्कम १ कोटी ३७ लाख रुपयाचे हस्तगत केले आहेत.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक भोकर डॉ. अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव नांदेड, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्रीमती डॉ. आश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस स्टेशन सायबर पो.उप.नि. एम.बी. चव्हाण, पोलीस अमलदार राजेंद्र सिटीकर, दीपक ओढणे, महेश बडगु, अविनाश ठोके. विलास राठोड मपोकॉ कांचन कसबे, रेश्मा पठाण, शुभांगी जाधव, मोहम्मद आसिफ, दावीद पिडगे, काशीनाथ कारखेडे, व्यंकटेश सांगळे, ज्ञानेश्वर यन्नावार, दिपक राठोड, साई शेंडगे यांनी पाडली आहे.
मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी CEIR पोर्टलवर हरवलेले व चोरीस गेलेल्या मोबाईलची माहिती अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. सदर कामगिरी बाबत मा. पालकमंत्री श्री. अतुल सावे यांनी सर्व पथकाचे अभिनंदन केले आहे.