सांगलीची जनता अंधारात का ? मनपा प्रशासनाचे डोळ उघडणार कधी? : लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/04/2026 10:35 AM

​सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात पथदिव्यांच्या (Street Lights) दुरावस्थेमुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. लोकहित मंच, सांगली च्या वतीने आम्ही प्रशासन आणि आयुक्त मॅडमकडे तात्काळ कारवाईची मागणी करत आहोत.
​आमचे प्रमुख प्रश्न आणि समस्या:
​📍 नवीन आयर्विन पूल: शहराचा मुख्य कणा असलेल्या या नवीन पुलावर विजेचे खांब तर आहेत, पण त्यावर अद्याप लाईटच लावण्यात आलेले नाहीत. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला पूल रात्रीच्या वेळी अंधारात का?
​📍 चिंतामणी नगर पूल (माधवनगर रोड): नवीन पुलाचे काम पूर्ण होऊनही इथे पथदिव्यांची सोय नाही. अंधारामुळे या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
​📍 १०० फुटी रोड (छत्रपती शाहू महाराज मार्ग): या मार्गावरील विजेच्या खांबांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक खांब गंजलेल्या अवस्थेत आहेत. बहुतांश दिवे बंद असल्याने नागरिकांना असुरक्षित वाटते.
​केवळ घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष कृती हवी! 

​- मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या