अर्धापूर :- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती रविवारी (ता.26) अर्धापूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण अर्धापूर नगर पंचायतचे लोकप्रिय नगरसेवक सोनाजी सरोदे यांच्या हस्ते करण्यात आले.समता सैनिक दलाने पंचशील ध्वजाला मानवंदना दिली.
शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील प्रज्ञा बौद्ध विहारात महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रविण देशमुख हे होते तर प्रमुख व्यक्ते म्हणून प्रा.राम वाघमारे, आकाशवाणी नांदेडचे निवेदक मिलिंद व्यवहारे यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अँड किशोर देशमुख,उपनगराध्यक्ष मुक्तदेरखाॅं पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णूकांत क-हाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चित्तरंजन ढेमकेवाढ, माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, नगरसेवक राजु शेटे, बाबुराव लंगडे, व्यंकटराव राऊत, मुसबिर खतिब,विराज देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल वानखेडे, माजी उपसरपंच सुनील देशमुख वाळकीकर, भाऊरावचे संचालक व्यंकटराव साखरे, अर्धापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गुणवंत विरकर, डॉ.विशाल लंगडे, युवानेते अभिषेक गुरखेल,
कामाजी अटकोरे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष लोणे, अँड.नितेश लोणे, शहराध्यक्ष योगेश हाळदे, बाळू माटे, गौरखनाथ राऊत, भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलास साबळे, गोपाल पंडित, बालासाहेब देशमुख आंबेगांवकर, माजी नगराध्यक्ष सौ.प्रणिता सरोदे, वंचितचे दिपक मगर,शिवहार घोडेकर,शेख जुबेर यांची उपस्थिती होती.
उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार पुस्तके, ग्रंथ भेट देवून करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्धापूर तालुका सार्वजनिक भिमजयंती मंडळाचे अध्यक्ष उमाकांत सरोदे यांनी करून जयंतीनिमित्त घेतलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.
सुत्रसंचलन जयंती मंडळाचे उपाध्यक्ष भिमराव सरोदे पेंटर यांनी केले तर आभार विलास सरोदे यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र सरोदे, जयभिम सरोदे, प्रशांत कांबळे, अरविंद कांबळे, गुणवंत सरोदे, प्रकाश सरोदे, विठ्ठल सरोदे, राजेंद्र साबळे, मारोती कांबळे, रूपेश कांबळे, सदाशिव गायकवाड, निखिल कांबळे, शुभम सरोदे, गौतम सरोदे, संतोष बहाद्दूरे, प्रवेश सरोदे,पंकज सरोदे यांनी परिश्रम घेतले आहे.