पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या जिल्हा समन्वयकपदी - राम तरटे

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/04/2026 5:20 PM

नांदेड  : नांदेड जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या  समन्वयक पदाच्या रिक्त जागेवर राम तरटे यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केली आहे.
राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्या अधिक भक्कम, मजबूत करण्याचा निर्णय परिषदेने  घेतला आहे.. त्यामुळे आता राज्यात नव्या नियुक्तया तसेच रिक्त जागा तातडीने भरल्या जाणार आहेत. रवी संगनवार यांची नांदेड महानगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नियुकी झाल्यापासून समन्वयक पद रिक्त होते. रिक्त पदावर राम तरटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
जिल्हा निमंत्रक प्रदीप नागपूरकर आणि समन्वयक राम तरटे यांनी जिल्ह्यातील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी वेळ द्यावा अशी सूचनाही राज्य निमंत्रकर एस.एम. देशमुख यांनी केल्या आहेत. जिल्हा समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल राम तरटे यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या