सांगलीचा कोल्हापूर रस्ता बनलाय खड्ड्यांचे साम्राज्य! सार्वजनिक बांधकाम विभाग नक्की आहे तरी कुठे?
शास्त्री चौक ते फळ मार्केटपर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, हेच आता समजेनासे झाले आहे. या जीवघेण्या रस्त्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत, मात्र प्रशासन अद्याप सुस्त आहे.
आमचे रोकठोक सवाल:
सार्वजनिक बांधकाम विभाग 'कोमात' आणि अधिकारी 'जोमात' का?
नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ कधी थांबणार?
रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी प्रशासन आणखी किती बळींची प्रतीक्षा करत आहे?
📢 लोकहित मंच, सांगलीचा इशारा!
जर तात्काळ खड्डे मुजवले नाहीत आणि रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले नाही, तर लोकहित मंच खालील पावले उचलणार:
१) खड्ड्यांची 'सप्रेम भेट': कोल्हापूर रस्त्यावर जे जीवघेणे खड्डे पडले आहेत, त्या खड्ड्यांचे फोटो काढून, त्यांची फ्रेम करून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना 'सप्रेम भेट' म्हणून दिली जाईल. जेणेकरून प्रशासनाचा हा 'विकास' त्यांना जवळून पाहता येईल!
२) पालकमंत्र्यांना घेराव: जनतेच्या प्रश्नांवर उत्तर मिळेपर्यंत पालकमंत्र्यांना घेराव घालून जाब विचारला जाईल.
३) भव्य सह्यांची मोहीम: प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर रोड परिसरात नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येईल.
"आम्ही फक्त कर भरण्यासाठी नाही, तर सुरक्षित रस्त्यांवर चालण्यासाठीही आहोत. प्रशासनाने आपली कुंभकर्णी झोप सोडावी, अन्यथा लोकहित मंच स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल!"
.
विनीत,
मनोज भिसे,
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली 🚩