काल सांगलीत झालेल्या जोरदार पावसामुळे प्रभाग क्रमांक १८ मधील शामराव नगर, शाहू कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्याला एका तळ्याचे स्वरूप आले आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे संपूर्ण रस्ताच पाण्याखाली गेला आहे. विशेष म्हणजे, स्थानिक रहिवाशांसाठी येण्या-जाण्यासाठी हाच एकमेव मुख्य रस्ता असल्याने त्यांची कमालीची कोंडी झाली आहे. रस्त्यावर साचलेल्या या साठलेल्या पाण्यातूनच नागरिकांना, महिलांना आणि लहान मुलांना वाट काढावी लागत आहे, ज्यामुळे येण्या-जाण्यास प्रचंड अडचण निर्माण झाली असून अपघाताचा धोकाही वाढला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे स्थानिक नागरिक अत्यंत त्रस्त झाले असून, महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने हालचाल करून या साचलेल्या पाण्याचा निचरा करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी तीव्र मागणी आता लोकहित मंचकडून केली जात आहे.
- मनोज भिसे
अध्यक्ष लोकहित मंच सांगली