गुणवत्ताधारक,गरीब होतकरू खेळाडूंना मुंबई क्रिकेट क्लिनिक देणार शिष्यवृत्ती;1 आणि 2 ऑगस्ट रोजी होणार निवड चाचणी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 30/07/2026 12:09 PM

नांदेड:-मराठवाडा क्रिकेट असोसिएशन संलग्नित मराठवाडा क्रिकेट अकॅडमीचा सामंजस्य करार दि.16 जुलै 2026 रोजी मुंबई क्रिकेट क्लिनिकशी झालेला असल्यामुळे त्याच धर्तीवर मराठवाड्यातील खेळाडूंना मुंबई येथील उच्च लेव्हल कोचिंग सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत याच उद्देशाने मराठवाडा क्रिकेट,अकॅडमी रेणापूरकर नेक्सस स्पोर्ट्स अकॅडमी कोनाळे कोचिंग क्लासेस जवळ इंडस्ट्रियल इस्टेट स्टेडियम परिसर नांदेड येथे मुंबई क्रिकेट क्लिनिकचे हेडकोच तथा आंतरराष्ट्रीय सर्टिफाईड प्रशिक्षक मयुरेश येळवे यांच्या नियंत्रणाखाली 12 ते 19 वयोगटाखालील मुले आणि मुली यांची निवड चाचणी आयोजित करण्यात आली असून निवड झालेल्या गुणवत्ताधारक,गरीब आणि होतकरू खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
मागील 3 दशकांपासून भारतीय टेस्ट क्रिकेट,वनडे क्रिकेट आणि टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये सुनील गावसकर,सचिन तेंडुलकर,रोहित शर्मा,सूर्यकुमार यादव,अजिंक्य राहणे, शार्दुल ठाकूर,शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल,श्रेयस अय्यर, आयुष म्हात्रे हे डझनभर खेळाडू, भारतीय संघात आणि इंडियन प्रीमियरलीगमध्ये मॅच विनिंग कामगिरी करीत आहेत.त्याचे संपूर्ण श्रेय मुंबई येथील उच्च लेव्हल कोचिंगला जाते.मुंबई येथील उच्च लेव्हलची कोचिंग सुविधा नांदेडसह मराठवाड्यातील खेळाडूंना उपलब्ध झाली पाहिजे यासाठी सदरील निवड चाचणीत मराठवाड्यातील खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे,असे आवाहन मुंबई क्रिकेट क्लिनिकचे (एमसीसी) नांदेड शाखा समन्वयक माधव रा.भुयारे यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या