कृष्णा व्हॅली चेंबरमध्ये एमएसएमई क्रेडिट आऊटरिच कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/08/2026 3:47 PM

कुपवाड : प्रतिनिधी 

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कार्यक्रम कृष्णा व्हॅली चेंबर, येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात उद्योजकांना उद्योग विस्तार, भांडवली गरजा तसेच आर्थिक विकासासाठी उपलब्ध असलेल्या विविध एमएसएमई कर्ज योजना, व्यवसाय कर्ज, मेगा बिझनेस लोन, जीएसटी लोन, हॉटेल्स व दुकानांसाठीच्या कर्ज योजना याबाबत सविस्तर माहिती व तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सांगलीचे ब्रँच मॅनेजर सुभाषसिंह राजपूत, सोलापूर बँकेचे संतोष कुमार तसेच मिरजचे शहाजीराजे कुंभार यांनी उपस्थित उद्योजकांना विविध कर्ज योजना, वित्तपुरवठा, कर्ज प्रक्रिया व उद्योगवाढीसाठी उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शन केले.
उद्योजकांच्या विविध प्रश्न व अडचणींवरही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. उद्योग विस्तारासाठी आवश्यक खेळते भांडवल, नवीन उद्योग सुरू करण्यासाठी तसेच व्यवसाय वाढीसाठी उपलब्ध असलेल्या अर्थसहाय्याच्या विविध पर्यायांची माहिती देण्यात आली.

यावेळी कृष्णा व्हॅली चेंबरचे माजी सचिव चंद्रकांत पाटील, माजी उपाध्यक्ष दिलीप चौगुले, माजी संचालक दिनेश पटेल, उद्योजक उपेन पटेल, गोपीकिशन सारडा, शीतल कर्नाळे, सुहास गवाने, कृष्णा व्हॅली चेंबरचे व्यवस्थापक अमोल पाटील, मदन काटकर तसेच परिसरातील उद्योजक उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या