ज्योती परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त जैन गुरुकुल आश्रमात सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये खाऊ वाटप व मान्यवरांचा सन्मान

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 23/09/2026 6:44 PM

ज्योती परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त जैन गुरुकुल आश्रमात सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये वाटप व मान्यवरांचा सन्मान
​नाशिक विशेष प्रतिनिधी:-
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे आनंदाचे क्षण सामाजिक योगदानाच्या माध्यमातून साजरे करण्याची परंपरा जपली जात आहे. याच उपक्रमांतर्गत समितीच्या नाशिक उपजिल्हाध्यक्ष तथा समाजसेविका ज्योती परदेशी यांचा वाढदिवस म्हसरूळ येथील जैन गुरुकुल बाल आश्रमात सामाजिक भावनेने साजरा करण्यात आला. या प्रसंगी आश्रमातील विद्यार्थी, परिसरातील समाजसेवक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​कार्यक्रमाची सुरुवात समितीच्या कलाध्यक्ष रेखाताई निकुंभ यांच्या "छोडो कल की बाते" या सुरेल गाण्याने झाली. "लहानांतल्या लहानाची सेवा हीच प्रभूसेवा" या तत्त्वाला अनुसरून आश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, चॉकलेट्स, फळे आणि स्नेहभोजन देण्यात आले. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समालोचन ॲड. उषा पगारे यांनी केले. या वेळी उत्कृष्ट सेवेबद्दल आठ मान्यवरांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी समितीच्या उत्तर महाराष्ट्र सचिव ज्योती काजळे, कार्याध्यक्ष अविनाश वाघ, उपाध्यक्ष दिलीप गायकवाड, तालुका उपाध्यक्ष राहुल मोरे, जयश्री जाधव, सुरेखा पेंढारकर, पूजा पाटील आणि ॲड. बाळासाहेब चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
​नाशिकभूषण तथा समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. "जनसेवा म्हणजे कुठल्याही स्वार्थाशिवाय वा अपेक्षेविना सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी व कल्याणासाठी केलेले कार्य होय; हीच भावना आम्ही जोपासतो," असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच ज्योतीताई परदेशी यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून या आश्रमात सर्वांना एकत्र आणल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात या विचारांचे स्वागत करण्यात आले.
​सत्कारमूर्ती ज्योती परदेशी यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले. या कार्यक्रमास तालुका कार्याध्यक्ष श्याम डावरे, मनोज पगारे, किरण परदेशी, प्राची शर्मा, आशा घोरपडे, पूजा पाटील, राजूभाऊ पगारे, संदीप पगारे, बाळासाहेब निकम, सुनील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या