ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

अर्धापूर येथील आशा व गट प्रवर्तकाचे बेमुदत संपाचे संबंधित कार्यालयात निवेदन.


  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 6/14/2021 8:07:10 PM

नांदेड:आशा वर्कर व गट प्रवर्तक  याना कोवीड 19 च्या महामारीत दररोज 8 तासाच्या वर काम करत राहावे लागत आहे.त्यांचे काम समाजाच्या दृष्टिने कोरोना महामारीमध्ये आत्यंत आवश्यक झाले आहे.जागतिक आरोग्य संस्थेच्या प्रमुखानी कोरोणा हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे पुढील अनेक वर्ष जगात रहाणार असल्याचे सांगीतले आहे.म्हणंजे सातत्याने आशा व गट प्रर्वतकाना सात ते आठ तास काम करावे लागनार आहे.म्हनुन त्याना इतर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्या प्रमाने शासकीय सेवेत कायम करून घेतले पाहीजे.आशा प्रवर्तकांना आठरा हजार व गटप्रर्वतकाना बाविस हाजार प्रति महा वेतन देण्यात यावे व अशा अनेक मागण्याचे बेमुदत संपांचे निवेदन तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती.वि्द्या झीने वैधकीय अधिकारी श्री. सचितानंद शिंदे गट विकास अधिकारी सौ. मिना रावताळे याना गट प्रर्वतक आनिता चव्हान आशा कार्यकर्ती‌ सौ. सारिका कापसे/नागठाने सौ.वंदना क्षीरसागर सौ.चंद्रकला फाटेकर,वंदना खिलारे,सारजा कदम,सौ.प्रेमिला आठवले, पंचशीला नरवाडे,सौ.वर्षा हतागळे,संगीता लोणे,सविता आंबेकर,आश्विनि सावंत,ध्रुपदा टोंपे,पार्वती डोंगरे,मिना कांबळे, सिमा थोरात,मिना सावते,ललिता सावते,यांच्या सह अनेक आशा कार्यकर्तीच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

Share

Other News