ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

तरूणांनो,उमद्या व सक्षम अशा नेतृत्वास साथ द्या : डॉ. रत्नाकर लक्षट्टे


  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 6/14/2021 8:30:55 PM

नांदेड:देगलूर बिलोली मतदार संघात होऊ घातलेल्या पोट निवडणुकीमध्ये सर्वंकश असा चेहरा असलेले नेतृत्व प्रा. उत्तमकुमार कांबळे च्या रूपाने उपलब्ध आहे. या भागातल्या सर्व तरुणांनी प्रा.उत्तमकांबळे यांना साथ दिली तर या मतदारसंघांचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही.असे प्रतिपादन डाॅ.  लक्षट्टे यांनी प्रा. उत्तमकुमार कांबळे मित्र परिवार आयोजित "सुसंवाद तरूणांशी" या कार्यक्रमात  केले.
प्रा. उत्तमकुमार कांबळे यांच्या "लुम्बिनी" या निवासस्थानी दिनांक 9.6.2021 रोजी "सुसंवाद तरुणांशी" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळेस विचारपीठावर प्रा. उत्तमकुमार कांबळे, डॉ. रत्नाकर लक्षट्टे, डॉ. आर.जे. गायकवाड, कृ.उ.बा.स. माजी सभापती यादवराव फिरंगे, पं. स.  माजी सभापती संजय शिंगाडे, अनिलकुमार वाघमारे, बालाजी दासरवाड, दीपक संगमकर व  अरुणकुमार सूर्यवंशी हे उपस्थित होते.याप्रसंगी डाॅ.आर. जे. गायकवाड, कृ.उ बा. समिती माजी सभापती  यादवराव फिरंगे, पं.स. मा. सभापती  संजय शिंगाडे, सुभाष कदम, मिलिंद वाघमारे, मिलिंद कावळगावकर, किरण कांबळे यांनी प्रा.उत्तमकुमार  कांबळे यांच्या विविध पैलूवर प्रकाश टाकला.
याप्रसंगी प्रा. उत्तमकुमार कांबळे यांनी तरुणांना साद घालताना मला विधानसभेत जाण्याची संधी मिळाली तर या भागातील जनतेला आमदार काय असतो हे दाखवून देईन असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. संजय शिंगाडे (माजी पं. स.  सभापती) यांनी केले. याप्रसंगी संदीप गायकवाड( सरपंच प्र. दावणगिर),ज्ञानेश्वर वाघमारे, हर्ष  कुऱ्हाडे, सुनील सोनकांबळे, विकास नरबागे, अमोल वाघमारे, राहुल बोने, सदानंद वाघमारे, मिलिंद वाघमारे, संदिप पांढरे, मारुती ढवळे, धम्मानंद वाघमारे, कपिल वाघमारे, कृष्णा कुऱ्हाडे,  बालाजी कांबळे, अमोल सोनकांबळे, पवन सावंत, संदेश कांबळे, प्रकाश, किरन देगलूरकर, रवी शंकपाळे, बालाजी कांबळे,  रामेश्वर कंधारे वअनिल हसनाळकर आदींची उपस्थिती होती. प्रा. उत्तमकुमार कांबळे सरांना आमदार करणे हे आमचे स्वप्न आहे असे विकास देगलूरकर यांनी प्रास्ताविकात म्हटले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत  करणाऱ्या सर्वांचे आभार विशाल बोरगावकर यांनी मानले.

Share

Other News