* आयुष विस्टीऑनकडून ३१७ विदयार्थ्याना स्वाध्याय पुस्तकांचे मोफत वाटप...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/10/2021 11:40 AM



कोरोणाच्या महामारीमुळे सर्व शाळा बंद झाल्या असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू झाले परंतु शिक्षण क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण झाल्या गोरगरीब पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल उपलब्ध नसल्याने तर कधी रिचार्ज नसल्याने तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कोळकेवाडी  केंद्राच्या भौगोलिक परिस्थितीमुळे बहुतांश भागात मोबाईल नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे सर्व विद्यार्थ्यांची अचूक अडचण ओळखून आयुष्यावरील संस्थेच्या माध्यमातून  विस्टीऑन टेक्निकल अंड सर्विसेस सेंटर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सी एस आर मधून अर्थसाहाय्याने आणि श्री राजीव शिंदे यांच्या प्रयत्नातून व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा चिपळून यांच्या कार्य तत्परतेने कोळकेवाडी केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत च्या सर्व ३१७ विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे होऊन गुणवत्ता वाढवण्यास मदत होण्यासाठी सर्व विषयांचे स्वाध्याय पुस्तिकेचे मोफत वाटप करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव श्री दीपक माने कोळकेवाडी पठार शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री दशरथ सुतार, राणे सुपर मार्केट चे सर्वेसर्वा श्री रुपेश राणे, श्री सुमित राणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
 सदर प्रसंगी मान्यवरांनी विस्टीऑन कंपनी चे अध्यक्ष मा श्री आशीष भाटिया आणि सहाय्यक मॅनेजर मा श्री सिद्धार्थ बंगार यांचे सहकार्याबद्दल खूप आभार मानले ,“आयुष सेवाभावी संस्था” कुपवाड ता. सांगलीचे संस्थापक अध्यक्ष श्री अमोल पाटील यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आणि त्यांच्या सामाजिक कार्यास खूप खूप शुभेच्छा दिल्या.
 उपक्रमाच्या यशस्वितेसाठी 
श्री फिरोज खान ,श्री काशीराम धापसे ,प्रभावती पाटील ,श्री संदीप शिंदे ,श्री गौतम जाधव ,श्री देवराज शिसोदे ,श्री युगेश कदम ,श्री विजय शिंदे ,सौ नंदा सन्मुख ,सौ अस्मिता राणे, श्री भरत पावसकर श्रीम. सुचिता जाधव ,श्री अशोक शिगवन इत्यादी शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या