*राजूर कॉलरी येथील WCL च्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक 4 च्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात,वेकोली प्रशासन कोमात….*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 26/10/2021 9:24 PM

वणी (26 ऑक्टो) :- राजूर कॉलरी येथील वॉर्ड क्रमांक चार मधील सांडपाणी वाहून जाण्यासाठी असलेला मोठा नाला तुडूंब भरल्यामुळे परिसरात दुर्गंधी युक्त वातावरण निर्माण झाल्यामुळे व मच्छराच्या साम्राज्यत गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तेव्हा या तुडुंब भरलेल्या मोठ्या नाल्याचा उपसा करण्यात यावा अशी मागणीचे निवेदन राजूर वासीयांतर्फे देण्यात आले. यांच्या या तक्रारीवरून ग्रामपंचायत राजूरने सब एरिया मॅनेजर डब्ल्यू. सी. एल राजूर कॉलरी याना निवेदन देण्यात आले आहे..


राजूर कॉलरी वॉर्ड क्रमांक चार मधून निघणारा मोठा नाला तुडूंब भरल्यामुळे या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या गावकऱ्यांना व डब्ल्यू सी एल मध्ये काम करणाऱ्या कामगारांना या दुर्गंधी युक्त वातावरणाचा त्रास सहन करावा लागत आहे. या दुर्गंधी युक्त घाणीच्या साम्राज्यत गावकर्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे येथील गावकर्यांना डेंगू, मलेरिया, ताप, खोकला, फुफुस या सारख्या आजार होत आहे. त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या नाल्याची साफ सफाई एक वर्षांपासून झाली नाही त्यामुळे हा नाला तुडूंब भरला आहे. व पावसाच्या दिवसात हा नाला तुडूंब भरून वाहल्यामुळे नाल्याचे सांडपाणी गावकऱ्यांच्या घराघरात शिरून अतोनात नुकसान झाले आहे. तरीपण डब्ल्यू सी एल ने दखल घेतली नाही.

हा मोठा नाला वॉर्ड क्रमांक चार मधून जात असल्यामुळे येथे वास्तव्य करणारे गावकरी हे डब्ल्यू सी एल च्या हद्दीत येत असल्यामुळे या गावकर्यांना सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही डब्ल्यू सी एल ची असून हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. तेव्हा गावकऱ्यांच्या व अन्य कोणालाही जीविताला धोका निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी डब्ल्यू सी एल प्रशासन जबाबदार राहील असे राजूर ग्रामपंचायत यांनी निवेदनातून सांगितले आहे.
संबधित निवेदनाच्या प्रति संबधित अधिकारी उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, गटविकास अधिकारी राजेश गायणार, ठाणेदार शाम सोनटक्के, महाप्रबंधक साहेब डब्ल्यू सी एल भालर वसाहत, अनवर खान हफिक रजा याना देण्यात आल्या आहेत . तेव्हा संबधित निवेदनाची दखल घेऊन कार्यवाही करण्यात यावी ,अशी मागणी सरपंच विद्या पेरकावार, उपसरपंच अश्विनी बलकी, व सचिव महेंद्र चाहनकर यांनी केली आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या