ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

उमेद ग्रुपच्या रक्तदान शिबरामध्ये तब्बल ३०१ जणांचे रक्तदान..


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 8/13/2022 4:44:09 PM

   
     उमेद ग्रुप फौंडेशन, श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल ब्लड सेंटर मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय छाया नेमिचंदजी मालू यांच्या 69 व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेले होते. सदर रक्तदान शिबिरामध्ये 301 रक्तदात्यानी रक्तदान केले. यात हिंदकेसरी प्रकाशबापू  पाटिल ब्लड बँक, सिद्धिविनायक ब्लड बँक, मिरज सिव्हिल ब्लड बँक, भारती ब्लड बँक व एम.एस. ब्लड बँकेनी सदर शिबिरामध्ये ब्लड साठ्याचे आयोजन केले
    सदर रक्तदान शिबिरामध्ये उमेद ग्रुपचा स्टाफ, कर्मचारी, कुपवाड माधवनगर परिसरातील व्यापारी, उद्योजक वर्ग व मित्र मंडळी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
   उमेद ग्रुप नेहमीच सामाजिक बांधीलकी जपत असते. उमेद ग्रुप  प्रत्येक वर्षी नवनवीन उपक्रम राबवित असते. 
    सदर रक्तदान शिबिराचे हे 6 वे वर्ष आहे तसेच सौ छाया नेमीचंद मालू व शेठ मुलचंद गोपीलाल मालू शाळेत मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन व सर्व मुलांना नाश्ता देण्यात आला आहे आयोजन उमेद ग्रुपचे संचालक मालू कुटूंबीय उमेद ग्रुपचे कर्मचारी यांच्याकडून करण्यात आले.

Share

Other News