नांदेड :- प्रादेशिक परिवहन कार्यालय, यांच्यावतीने वायुवेग पथकामार्फत प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड व इतर ठिकाणी अटकावून असलेल्या व वाहनधारकामार्फत सोडविण्यात न आलेल्या वाहनाची ई-लिलाव प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने https://www.eauction.gov.in या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. त्याचा सांकेतांक क्रमांक 2026_ MH_33493 असा आहे.
ई-लिलाव प्रक्रीयासंबंधी सविस्तर तपशील प्रक्रीया, दिनांक व वेळ पुढीलप्रमाणे आहे.
ई-लिलाव ऑनलाईन/ऑफलाईन कागदपत्रे नोंदणीची सुरवात 20 मार्च रोजी सकाळी 11 वा. होईल तर 27 मार्च 2026 रोजी दुपारी 1 वा. समाप्त होईल.
ई-लिलाव ऑनलाईन/ऑफलाईन प्राप्त कागदपत्रे पडताळणी व मंजूरीबाबत सुरवात 20 मार्च सकाळी 11 वा.तर 27 मार्च 2026 रोजी दुपारी 5 वा. समाप्त होईल.
बोलीदारांना वाहने पाहणीसाठी सुरवात 20 मार्च रोजी सकाळी 11 वा. तर 27 मार्च 2026 रोजी दुपारी 5 वा. समाप्त .
ई-लिलाव ऑनलाईन लिलाव 30 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वा. ते सायंकाळी 4 वाजेपर्यत राहील. यांची नोंद सर्व संबंधीतानी घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रंशात कंकरेज यांनी केले आहे.