आज सांगली जिल्हा न्यायालयाच्या आवारात इलेक्ट्रिक गाडीमुळे इतर एक गाडी जळून पूर्ण खाक झाली
अपघात हे अपघातच असतात मात्र सदर ठिकाणी आज आमच्या न्यायालयातील इतर कामासाठी आज न्यायालयात हजर असताना फायर अलार्म वाजले म्हणून बघायला गेलो असता
एक दुर्दैवी गोष्ट लक्षात आली जिल्हा न्यायालयातील फायर सेफ्टी साठी लावण्यात आलेले फायरचे सिलेंडर (Fire extinguisher cylinder) आठ ते दहा वापरात आणले त्यातील तीनच व्यवस्थित कामासाठी आले बाकी इतर चार सिलेंडर मधून पाणी निघत होते मग या महत्त्वाच्या न्यायालयातील न्यायाधीश असतील वकील असतील किंवा न्याय मागण्यासाठी येणारे सर्वसामान्य नागरिक असतील हे सुरक्षित आहेत का..?
या फायर सिलेंडरचा ऑडिट होतंय का..?
मी ज्या ठिकाणी कोर्टाच्या आवारात बसलो होतो त्यातील Fire extinguisher cylinder बघितला त्याच्यावर 21 मार्च 2026 अशी त्याची तारीख आहे.
आजच्या घटनेत जीवित हानी झाली नाही हे आपलं सुदैव आहे मात्र दुर्दैवाने असे प्रकार घडले आणि सिलेंडर जर चुकीच्या पद्धतीने निघत असतील तर याला जबाबदार कोण
त्यामुळे वरील सर्व प्रकारची चौकशी करण्यात यावी व फायर ऑडिट वर्षातून दोन ते तीन वेळा तपासण्यात यावे अन्यथा मोठी दुर्घटना घडल्यावर मोठे काहीतरी घडू शकते.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.