आवाहन

BREAKING NEWS

पोलिसांचा अवैध धंद्यावरील कारवाईचा धडाका सुरूच : तीन अवैध धंद्यांवर कारवाई

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 6/1/2023 12:02:48 PM



आरटी आय न्यूज नेटवर्क 
दहिवडी प्रतिनिधी 

दी:दहिवडी पोलिसांचा अवैध धंद्यावरील कारवाईचा धडाका सुरूच आहे. मंगळवार दि. ३० मे रोजी या एकाच दिवसात दारू, जुगार, आणी वाळू अशा तिन्ही अवैध धंद्यांवर कारवाई करून तीन गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह दमदार कामगिरी केली असून तिन्ही गुन्ह्यात मिळून ६ जणांना ताब्यात घेतले असून एकूण ५ लाख ६८ हजार ७४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
       याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की मंगळवार दि. 30 मे रोजी जाशी ता. माण गावचे हद्दीत राजाराम खरात यांचे पडीकवाड्याचे भिंतीच्या आडोशाला राहुल सदाशिव खरमाटे , अशोक नथुराम खाडे , अजित बाळकृष्ण दराडे ,  गणेश विनायक खाडे  हे बेकायदा बिगर परवाना तीन पाने पत्त्यावर तिरेट नावाचा जुगार खेळत असताना ताब्यात घेतले असून त्यांचेकडून जुगाराचे साहित्य व रोक रक्कम असे एकूण 58740/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून त्यांचेवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास पोलीस नाईक एस एस वावरे करीत आहे.
         दुसऱ्या गून्ह्यात दि .30 मे रोजी दहिवडी ता.माण गावचे हद्दीत फलटण चौक दहिवडी येथे सार्वजनिक ठिकाणी अजित चंद्रकांत जाधव वय- 23 वर्षे, रा.बिदाल याने मादक द्रव्याचे सेवन केल्याचे आढळून आले म्हणुन त्याचे विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 85 (1) प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद दिली आहे अधिक तपास पोलीस नाईक एस.एस म्हामने करीत आहे
        तिसऱ्या गुन्ह्यात  दि.  31 मे रोजी मध्यरात्री गोंदवले ते दहिवडी रोडने वाळुची चोरटी वाहतुक सुरु आहे असे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळालयावर पोलिसांनी रात्र गस्ती सुरू असताना  गोंदवले बाजुकडुन दहिवडी बाजार पटांगण येथे समोरुन एक निळ्या रंगाचा  नंबर नसलेला डंपर  येत असताना दिसला या बाबत संशय आल्याने सदर डंपरवरील चालक विकास विलास सावंत रा. दिवड ता. माण याला थांबवून डंपरची पहाणी केली असता हौदयात अवैध उत्खनन करुन सुमारे दोन ब्रास वाळु हौद्यात भरुन स्वताचे आर्थिक फायद्याकरिता चोरटी वाहतुक करित असताना मिळुन आला म्हणुन भा. द.वी.स अधिनियम कलम 379, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 9, 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सुमारे पाच लाख दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बी. एस खांडेकर करीत आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या