म्हसवड सिद्धनाथ यात्रे दिवशी वाहतुकीत बदल

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 09/12/2023 3:21 PM


आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)

   दि: म्हसवड सालाबाद प्रमाणे सिद्धनाथ देवाची यात्रा डिसेंबर महिन्यात दि. ११ते १५ या कालावधीत संपन्न होत असून यात्रेचा मुख्य दिवस १३ डिसेंबर पासून दरवर्षी नमूद दिवशी सिद्धनाथ देवाचा रथ उत्सव साजरा होत असतो.       
      या यात्रेसाठी महाराष्ट्रातून तसेच कर्नाटक,आंध्र प्रदेश राज्यातून सुमारे ४ ते ५ लाख भाविक येत असल्याने यात्रा कालावधीत म्हसवड शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये व यात्रा शांततेत पार पाडणे महत्त्वाचे आहे या करता वाहतुकीचे योग्य नियोजन करून काही ठिकाणी बदल करण्यात आला आहे. 
     या यात्रेमध्ये वाहनांचा अडथळा निर्माण होऊ नये व वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरता वाहतूक व्यवस्था करण्याची आवश्यकता असल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३(१)ब प्रमाणे  म्हसवड सिद्धनाथ यात्रेदरम्यान खालील प्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात येत आहेत. 
आटपाडी ते सातारा किंवा सातारा आटपाडी व सातारा पंढरपूर जाणारी येणारी दोन चाकी वाहने व लहान वाहने याकरिता शिंगणापूर चौक ते युवराज सूर्यवंशी यांचे निवासस्थान समोरून शिक्षक कॉलनी भटकी रोड, भटकी गाव ते माळशिरस रस्ता माळशिरस चौक अशी वळवण्यात आली आहे. 
   मोठ्या व अवजड वाहना करता पर्यायी मार्ग पोळ पेट्रोल पंपाच्या पाठीमागून ते खांडेकर तालीम शिक्षक कॉलनी भाटकी रोड भाटकी गाव ते माळशिरस रस्ता माळशिरस चौक अशी वळवण्यात आली आहे तसेच दिघंची,आटपाडी, शेनवडी बाजू कडून येणारे व पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक वीरकरवाडी चौकातून मेगा सिटी नागोबा मंदिर कुकुडवाड रोड अशी वळवण्यात आली आहे. 
    वरील नियमाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३१अन्वे कारवाई पात्र राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.

Share

Other News

ताज्या बातम्या