वित्तीय शिस्त काळाची गरज* डॉ. मोहनभाऊ

  • Y.D.Dhake (Bhusawal)
  • Upadted: 20/02/2024 7:43 PM


भुसावळ
*वित्तीय शिस्त काळाची गरज* डॉ. मोहनभाऊ फालक ----------अलीकडच्या काळात गुंतवणुकीचे अनेक प्रकार बाजारात आहेत परंतु कोणत्या क्षेत्रात आपण किती गुंतवणूक करावी यासाठी अभ्यास करणे गरजेचे आहे अशी माहिती ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक यांनी दिली निमित्त होते भुसावळ येथील कला विज्ञान आणि पू. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटना आणि वाणिज्य व व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फायनान्शियल फिटनेस जिम या राष्ट्रीय कार्यशाळा अध्यक्ष पदावरून डॉ. मोहन फालक बोलत होते यावेळी व्यासपीठावर त्यांच्या समवेत ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय श्री महेश फालक, सेक्रेटरी मा.विष्णु चौधरी संचालक मा. श्री  प्रभाकर पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही .पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच.ब-हाटे, डॉ.ए. डी.गोस्वामी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.एम.पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा.स्वाती पाटील, ताप्ती पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका नीना कटलर, वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख व कार्यशाळा निमंत्रक प्रा. डॉ. ममताबेन पाटील, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व कार्यशाळा समन्वयक प्रा. प्रशांत पाटील, डॉ. जी.आर.वाणी,प्रा.दीपक पाटील,प्रा. हर्षल पाटील, प्रा.डॉ.गौरी पाटील , प्रा. स्वाती शेळके, प्रा.डॉ.सचिन येवले,व्यासपीठावर उपस्थित होते. उद्घाटन समारंभ संपन्न झाल्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बढे कॅपिटलचे संस्थापक मा.श्री ज्ञानेश्वर बढे यांनी गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन केले त्यात त्यांनी दोन भागात मार्गदर्शन केले पहिल्या भागात स्टॉक मार्केट टेक्निकल ऍनालिसिस यावर मार्गदर्शन केले या मार्गदर्शनात त्यांनी बाजारात भाग केव्हा खरेदी करावे विक्री केव्हा करावी यावर मार्गदर्शन केले. तसेच दुसऱ्या भागात त्यांनी वित्तीय उत्पन्नात नियोजनाबाबत मार्गदर्शन केले, त्यात त्यानी उपलब्ध असलेल्या उत्पन्नात किती भागाची बचत करावी व किती खर्च करावा, बचतीची गुंतवणूक कुठे आणि कशी करावी यावर भाष्य केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.चंद्रकांत सरोदे यांनी केले तर प्रस्ताविक डॉ.ममता पाटील यांनी केले. व आभार प्रदर्शन प्रा. स्मिता बेंडाळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील सर्व प्राध्यापक, माजी विद्यार्थी संघटना चे सर्व सन्माननीय सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Share

Other News

ताज्या बातम्या