नांदेड : शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा क्र. १) अंतर्गत जिल्हाधिकारी नांदेड राहुल कर्डिले,अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड,निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड तालुक्यातील दुसरे शिबिर लिंबगाव येथे उत्साहात पार पडले. विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे या शिबिराला परिसरातील 16 गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नांदेड उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ हे होते. याप्रसंगी त्यांनी प्रशासन लोकाभिमुख करणेसाठी व शासकीय योजनांचा तळागाळातील जनतेने लाभ देण्यासाठी शासनाची एकाच ठिकाणी सर्व कामे होण्यासाठी हे शिबिर आयोजित केलेले आहे. या शिबिरामध्ये
960 डिजिटल सातबारा, 640 आठ-अ उताऱ्यांचे वाटप, विविध प्रमाणपत्र वाटप 621 अर्जदारांना व 15 जणांना संजय गांधी योजनेचा लाभ वाटप करण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.
या शिबिरामध्ये महसूल विभाग, ग्रामविकास, आरोग्य, कृषी, भूमिअभिलेख, (मोजणी) तसेच दुय्यम निबंधक,प्राथमिक आरोग्य केंद्र,बाल विकास प्रकल्प विभाग,संगायो विभाग,पुरवठा विभाग,बचतगट विभागासह विविध शासकीय विभागांनी सहभाग घेतला. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देत लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले.
तहसील कार्यालय, नांदेड यांच्या वतीने शिबिरात महसूली सेवांचे मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात आले. यामध्ये 960 ऑनलाईन डिजिटल सातबारा उतारे व 640 आठ-अ उतारे, विविध प्रमाणपत्र 621, नागरिकांना देण्यात आले. तसेच 15 पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ प्रदान करण्यात आला. याशिवाय फेरफार संदर्भातील अर्जही स्वीकारण्यात आले.
शिबिरामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,सातबारा, ८-अ उतारे, सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी आदी महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच आरोग्य विभाग, भूमिअभिलेख विभाग व पंचायत विभागानेही नागरिकांना विविध सेवा पुरवल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार संजय वारकड यांनी केले. आपल्या प्रस्ताविकात त्यांनी सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यात येत असल्याचे सांगीतले.
तसेच अकृषिक, जिवंत सातबारा, सामाजिक अर्थसहायाच्या योजना आदिंची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले व
संजय गांधी निराधार योजनेचे दिव्यांग लाभार्थी यांनी दिव्यांग कार्ड (यूडीआयडी कार्ड) काढून घेवून सादर करावे, असे आवाहन केले.
नायब तहसिलदार सुनिल माचेवाड व स्वप्नील दिगलवार व पुरवठा निरीक्षक रवींद्र राठोड यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण केले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लिंबगावचे सरपंच कमलबाई संजयराव कदम,जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख सिमा देशमुख,गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर,उप अधीक्षक भूमिअभिलेख बळवंत मस्के,तालूका आरोग्य अधिकारी डाॅ.प्रविण मुंडे,मेडिकल अधिकारी डाॅ.पंडित डवले,शिक्षण विस्तार अधिकारी लता कवठेकर,विस्तार अधिकारी पंचायत राजू केंद्रे,बालविकास प्रकल्प चे पंडित मॅडम,जि.प हायस्कूल लिंबगाव चे मुख्याध्यापिका एस एल शेळके मॅडम अदिची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्राम महसूल अधिकारी अश्विनी गिरडे यांनी केले व आभार प्रदर्शन लिंबगावचे मंडळ अधिकारी रुपाली वाढोरे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, लिंबगाव महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी रुपाली वाठोरे, ग्राम महसूल अधिकारी डॉ महेश जोशी , चंदा पवार ,महावीर ब्रिदाळे, उदयकुमार मिसाळे व ग्राम पंचायत अधिकारी लिंबगाव डाकनवाले यांनी परिक्षम घेतले. संगांयो विभागाचे सुनिता परोडवाड, प्रितिका मुडगुलवार, संतोष वाघमारे , पुरवठा विभागाचे चंदा पवार, प्रतिभा मारतळेकर,आपले सरकार सेतू चालक कदम अशोक , गजानन घोगरे ,सुनील सूर्यवंशी , शिंदे आदिनी सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.तसेच मंडळ अधिकारी अनिरुद्ध जोंधळे, शिवानंद स्वामी,संतोष अस्कूलवार, कृष्णा येलमट्टे ,मारोती कदम,रमेश गिरी,मारोती जमदाडे,मारोती जमदाडे, मारोती श्रीरामे व तालुक्यातील सर्व महसूल सेवक यांनीही उपस्थित राहून सहकार्य केले.तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी उपस्थित राहून अभियानास सहकार्य केले. कार्यक्रमास जि प हायस्कूलच्या शिक्षिका गीता सुळे यांनी आकर्षक रांगोळी काढली होती.शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.