शामराव नगरांसह परिसरातील गटारीच्या निकृष्ठ कामांची चौकशी व्हावी : लोकहिन मंच अध्यक्ष मनोज भिसे

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/05/2024 6:12 PM


   सांगली प्रतिनिधी:--        सांगली शहरातील शामराव नगर हा एक महत्त्वाचा भाग असून या भागात सर्वसामान्य नागरिकांची वस्ती आहे. मात्र या परिसराकडे महानगरपालिका प्रशासनाकडून आजपर्यंत स्वच्छता औषध फवारणी नियमित पाणीपुरवठा रस्ते याबाबतीत दुर्लक्ष राहिलेलं आहे. आता तर या शामराव नगरासह परिसरातील गटारांची गेल्या पाच वर्षात सुमारे अडीच कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. परंतु आपल्याच ठेक्यात काम करणारे ठेकेदार आणि नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून गटारांचं बांधकाम हे जमिनीची स्थिती न पाहता चुकीच्या पद्धतीने उतार करून करण्यात आले आहे. परिणामी गटारातून पाणी वाहून न जाता त्यास ठिकाणी सांडपाणी साचून राहते त्यामुळे दुर्गंधी सुटते. शिवाय या दुर्गंधीयुक्त पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत आहे याचा परिणाम म्हणून या परिसरातील नागरिकांचे डेंग्यू सारख्या रोगाने आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. त्यामुळे गटार कामाचे अडीच कोटी रुपये गटारातच गेल्याची भावना समस्त नागरिकांची होत आहे.महत्त्वाचे म्हणजे जर अडीच कोटी रुपयांची कामे केले असतील तर त्यांच्या निविदा भरणा करण्यापासून ते कामाची बिले निघेपर्यंत कामाच्या दर्जाची पाहणी करणे व त्यांचा अहवाल सादर करणे अत्यंत आवश्यक असते असा अहवाल सादर केला किंवा कसे केला असेल तर कुणाच्या सहीने सादर झाला आणि त्या तंत्रिका अधिकाऱ्याने गटारीच्या उतारा बद्दल काही तपासणी केलेली आहे किंवा नाही याची शहानिशा करणे आवश्यक आहे.गटारीच्या कामाबद्दल गटारीचा उभा छेद तसेच आडवा छेद म्हणजेच ती सेक्शन व एच  सेक्शन हे कॉन्ट्रॅक्टर ने दिलेल्या नकाशे घेऊन जाग्यावरती गटारीच्या बांधकामाची तपासणी करणे आवश्यक आहे.गटारीची निविदा प्रसिद्ध करताना त्यामध्ये गटारीची देखभाल आणि दुरुस्ती व त्यासाठीचा कालावधी याचा उल्लेख करणे अंतर्भूत करणे आवश्यक असते असे नसल्यास या गोष्टी मुद्दाम कमकुवत ठेवण्यात आलेल्या आहेत असे सामान्य जनतेस वाटणे सहज शक्य आहे.यापुढे रस्ते व गटारी तसेच इतर कोणतेही निविदा प्रसिद्ध करताना त्या बांधकामाची अथवा कार्यकंत्राटाची उभारणी व बांधकामा बरोबरच देखभाल आणि दुरुस्ती या गोष्टींचा अंतर्भाव करण्यात यावा अशी मागणी आम्ही लोकहित मंचाच्या वतीने करत आहोत असे आत्तापर्यंत न केल्यामुळे बांधकामासाठी वेगळे टेंडर आणि देखभाल दुरुस्तीसाठी वेगळे टेंडर असा खर्च दोन दोन वेळा केला जातो याचा विचार होणे आवश्यक आहे.
  वेगवेगळ्या दोन-दोन टेंडर मुळे जनतेने भरलेल्या कराचा योग्य वापर न होता एकाच कामावर दोन दोन वेळा खर्च होत आहे असे निरीक्षण प्राप्त झाले आहे.    शामराव नगर व परिसराचा भूभाग हा बशीच्या आकाराचा असल्यामुळे या ठिकाणी मोठे आणि कार्यक्षम संप आणि पंप सिस्टीम कार्यान्वित करणे आवश्यक आहे परंतु अशी सिस्टीम अस्तित्वात  आहे का आणि पूर्ण क्षमतेने काम करते का याची तपासणी करणे व त्याच्या अहवाल जनतेला सहज उपलब्ध होणे आवश्यक आहे.
            दरम्यान ही तुंबलेली गटारं वेळोवेळी स्वच्छही केली जात नसल्याच्या आणि इकडे स्वच्छता कर्मचारी मुकादम फिरकतही नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी लोकहित मंचेकडे येत आहेत. शिवाय तक्रार करणाऱ्या नागरिकांना उडवाउडवीची आणि अरेरावीची भाषा वापरून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आणि आर्मोठेपणामुळे ज्ञानेश्वर कॉलनी, मॉडेल कॉलनी महाराजा भडंग कारखाना, जहीर मस्जिद परिसर, तिरंगा चौक ते विश्वनाथ चौक, फिरदोस कॉलनी, जनता बँक, महादेव कॉलनी, समता कॉलनी, देवेंद्र सोसायटी, महसूल कॉलनी, साई कॉलनी, दुर्वांकुर कॉलनी आदी भागातील गटार कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदारासह अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी आज महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे केली आहे .दरम्यान सदर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अन्यथा आगामी काळात या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशाराही मनोज भिसे यांनी दिला आहे .यावेळी जयराज पाटील मिलिंद कांबळे सयाजी घाटगे आदी उपस्थित होते .

Share

Other News

ताज्या बातम्या